टक्केवारीच्या ‘...या’ खेळात नवी मुंबईकर वेठीस!  
मुंबई

टक्केवारीच्या ‘...या’ खेळात नवी मुंबईकर वेठीस!

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : टक्केवारीच्या समीकरणामुळे बदनाम असलेल्या स्थायी समितीमधील कामकाजाचा फटका आता थेट सर्वसामान्य नागरिकांना बसण्यास सुरुवात झाली आहे. घसघशीत टक्केवारी देणाऱ्या मर्जीतील कंत्राटदारालाच सीबीडीतील वाहनतळाचा ठेका मिळावा, या अट्टाहासावर सत्ताधारी अडून बसले आहेत. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा आलेला वाहनतळाचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी नामंजूर केला. त्यामुळे प्रशासनाला पुन्हा फेरनिविदा काढाव्या लागणार आहेत. या वेळखाऊ प्रक्रियेमुळे सीबीडी-बेलापूरच्या जनतेला वाहनतळाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

शहरातील वाहनांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत वाहनतळाची जागा अपुरी असल्यामुळे रोजच्या संध्याकाळी वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पालिका प्रशासनातर्फे सीबीडी-बेलापूर सेक्‍टर 15 येथील भूखंड क्रमांक 39 वर सुमारे 30 कोटी रुपये खर्च करून बहुमजली वाहनतळ उभारले जाणार आहे. या वाहनतळामुळे तब्बल 800 वाहनांचा प्रश्‍न सुटणार असल्याने बेलापूर व सीबीडीतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. प्रशासकीय मंजुरीसाठी हा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर आला, तेव्हा प्रशासनाने निविदा प्रक्रियेच्या शर्यतीत अजवानी, महावीर आणि जे. एम. म्हात्रे हे कंत्राटदार तांत्रिक समितीने अपात्र ठरवल्यामुळे मे. यु.सी.सी. इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रा. लि. यांना देण्याचे प्रस्तावित केले होते; परंतु, हा मर्जीतील कंत्राटदार नसल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी गेल्या आठवड्यातील स्थायी समितीमधील हा प्रस्ताव स्थगित केला. त्यानंतर एक आठवड्याने शुक्रवारी (ता.27) स्थायी समितीच्या पटलावर हा प्रस्ताव आला असता पुन्हा नामंजूर केला. या स्थायी समितीच्या सभेत सत्ताधाऱ्यांनी तांत्रिक समितीच्या कामकाजावर आक्षेप नोंदवत अपात्र कंत्राटदारांना कमी पडलेले कागदपत्र सादर करून पुन्हा संधी देण्याची मागणी केली आहे. 

सत्ताधारी दिवाळखोराच्या प्रेमात 
पालिकेची विविध विकासकामे करणारा एक कंत्राटदार वित्त टंचाईमुळे आर्थिक दिवाळखोर घोषित झाला आहे. या कंत्राटदाराने नवी मुंबईतील बड्या नेत्यांना काही टक्केवारी मंजूर केल्यामुळे स्थायी समितीमधील सत्ताधाऱ्यांच्या शिलेदारांना प्रशासनाच्या कंत्राटदाराला विरोध करावा लागत आहे. परंतु, या कंत्राटदाराच्या व्यक्तींनीही स्थायी समितीच्या सुभेदाराला कागद दर्शन केल्यामुळे, आलेले कागद परत कसे पाठवायचे, अशी चर्चा महापालिकेत रंगली आहे.

पालिकेतर्फे तयार करण्यात येत असलेला बहुमजली वाहनतळ उभारणीचे काम कोणत्याही कंत्राटदाराला मिळो, त्याच्याशी काही संबंध नाही. फक्त निविदा प्रक्रियेत तांत्रिक समितीने कोणावर अन्याय करू नये, तसेच पालिकेच्या पैशांची बचत व्हावी हाच प्रस्ताव नामंजूर करण्यामागील हेतू आहे. 
- नवीन गवते, सभापती, स्थायी समिती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Election Akhilesh Yadav: उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध; भाजपला टक्कर देण्यासाठी 'हे' मुद्दे घेऊन मैदानात

Onion Rate: कांद्याचे भाव घसरले! 9 दिवसांत 1,800 रुपयांची घसरण; लासलगावमध्ये आजचा दर किती?

आनंद... ज्याचा त्याचा! ; जुन्या क्रिकेट मासिकांतील दुर्मिळ लेख, छायाचित्रे आणि दिग्गज खेळाडूंच्या आठवणी जतन करण्याचा अनोखा आनंद

INDIA PAVILION AWARD: व्हेनिस आर्ट बिएनालेमध्ये भारताचा डंका! 'बेस्ट नॅशनल पॅव्हेलियन' पुरस्कार; काय आहे खास? जाणून घ्या

IND vs NZ 2nd Test Weather Update: भारत-न्यूझीलंड मॅच पाहण्यासाठी पहाटे उठण्यापूर्वी हे नक्की वाचा... Christchurch मधून Live अपडेट्स; नेमकं काय घडणार?

SCROLL FOR NEXT