मुंबई

आता इन्फ्रारेड कॅमेरा तुमच्या शरिराच्या तापमानावर लक्ष ठेवणार; पण कुठे? वाचा बातमी सविस्तर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी मध्य रेल्वेने इन्फ्रारेड कॅमेरा बसवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे हा कॅमेरा असून तो अनेक प्रवाशांचे तापमान एकाचवेळी तपासू शकत आहे. एखाद्या प्रवाशामुळे कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी हा उपाय अंमलात आणला आहे.

तिकीट धारकांनाच प्रवेश देण्याची व्यवल्था केल्यानंतर तसेच कॅप्टन अर्जुनची साथ दिल्यानंतर आता हा नवा उपाय करण्यात आला आहे. हा फॅब्रिआय अनेक प्रवाशी चालत असतानाही त्यांचे तपमान तपासू शकतो तसेच त्याची नोंद करु शकतो. सध्या मुंबई सीएसएमटी तसेच कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनसवर येणाऱ्या प्रवाशांची याच फॅब्रीआयच्या आधारे तपासणी होत आहे. प्रवाशांची प्रवेशद्वारावरील गर्दी कमी करण्यासाठी याचा प्रामुख्याने उपयोग होत आहे. 

फॅब्रिआय जास्त तापमान असलेल्या व्यक्तीबाबत लगेच जाणीव करुन देतो. त्यास ब्लॅक बॉडीची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे स्टेशनात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीचे तापमान जवळपास अचूक नोंदवले जाते. त्यात फारतर 0.3 अंशाचा फरक पडू शकतो. यात सेन्सरचा वापर करण्यात आला आहे. तो माणसाच्या शरीरातून असलेल्या तपमानाची नोंद करतो आणि त्याद्वारे व्यक्तीची टू डी प्रतिमा तयार करतो. यात किती तापमान असल्यास प्रवेश द्यावा हे निश्चित करण्यात आले आहे. त्यापेक्षा जास्त तापमान असल्यास कॅमेरास जोडलेल्या संगणकीय स्क्रीनवर वेगळा रंगात प्रतिमा दिसते. ही यंत्रणा रेल्वे प्रवास सुरक्षित करण्याच्या मार्गातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT