File Photo 
मुंबई

कांद्याचे दर आजही चढेच, ही आहे कारणे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कांद्याचे भाव पुन्हा भडकले आहेत. घाऊक बाजारात प्रतिकिलो 50 रुपये भाव असलेला कांदा किरकोळ बाजारात 70 रुपयांना विकला जात आहे. व्यापारी व शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचा कांदा साठवून ठेवल्यामुळे कांद्याचे भाव अजून आटोक्‍यात येत नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

अवकाळी पावसामुळे गेल्या वर्षी कांद्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यातच नवा कांदा उशिरा बाजारात आला. त्यामुळे कांदा किरकोळ बाजारात तब्बल दीडशे रुपयांवर गेला होता. त्यानंतर भाव कमी झाले असले, तरी ते पन्नाशीवरच राहिले. गेल्या आठवड्यात एक किलो कांदा घाऊक बाजारात 40 रुपये; तर किरकोळ बाजारात 60 रुपयांना विकला जात होता. या आठवड्यात किरकोळ बाजारात एक किलो कांद्यासाठी 70 रुपये मोजावे लागत आहेत. त्यातच बाजारात आलेला कांदा द्वितीय श्रेणीतील आहे.

व्यापारी आणि शेतकऱ्यांनी प्रथम श्रेणीच्या कांद्याची साठवणूक केल्यामुळे भाव खाली उतरत नाहीत, असे भायखळा भाजी मंडईचे अध्यक्ष किरण झोडगे यांनी सांगितले. पुढील पावसाळ्यासाठी व्यापाऱ्यांनी आतापासूनच कांदा साठवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मागणीनुसार कांद्याचा पुरवठा होत नसल्याने भाव चढेच राहतात. मार्चमध्ये नवीन कांदा बाजारात येण्याची शक्‍यता आहे. तोपर्यंत कांदा वधारलेलाच राहण्याची शक्‍यता आहे. 

व्यापारी, शेतकरी चांगल्या दर्जाच्या कांद्याची साठवणूक करत आहेत. त्यामुळे कांद्याचे भाव कमी होत नाहीत. राज्य सरकारने कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध घालावेत, तरच कांद्याचे भाव आटोक्‍यात येतील. 
- किरण झोडगे,
अध्यक्ष, भायखळा भाजी मंडई

Onion is expensive due to storage

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर नशेच्या गर्तेत, तरुणाईला ड्रग्जचा विळखा; २ महिन्यांत ८८ किलो अंमली पदार्थ जप्त, ४१ गुन्हे नोंद

स्टार प्रवाहच्या प्रेक्षकांना धक्का! 'या' दोन मालिका घेणार निरोप? वाहिनीच्या 'त्या' निर्णयानंतर चर्चेला उधाण

Photos : उत्खननात सापडली चक्क 1000 वर्षांपूर्वीची अंगठी; दुर्मिळ फोटो जगभर व्हायरल, तुम्हीही नक्की पाहा..

PM-Rahat Scheme: मोठी बातमी! रस्ता अपघातात जखमी झाल्यास रुग्णालयात ठेव भरावी लागणार नाही; सरकारकडून अपघातग्रस्तांना दिलासा

Latest Marathi News Live Update : नांदेड विमानतळावर पोलिसांनी महापौरांना आत जाण्यापासून अडवलं

SCROLL FOR NEXT