मुंबई

ऑनलाईन मतचाचणीत महापोर्टल नापास, वाचा संपुर्ण बातमी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सरकारी विभागांच्या विविध पदांची भरती महापरीक्षा पोर्टलद्वारे करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे. या पोर्टलविषयी "एमपीएससी स्टुडंट राईट्‌स' या संघटनेने समाजमाध्यमावर घेतलेल्या ऑनलाईन मतचाचणीत तब्बल 44 हजार 477 उमेदवारांनी आपले मत व्यक्त केले आहे. यात 87.2 टक्के उमेदवारांनी हे पोर्टल बंद करण्याबाबत कौल दिला आहे; तर 12.8 टक्के उमेदवारांनी सुधारणा करून पोर्टल पुन्हा सुरू करण्याकरिता कौल दिला आहे. 

महापरीक्षा पोर्टलमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत परीक्षार्थींनी ते बंद करण्यासाठी एल्गार पुकारला होता. स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी याविरोधात आवाज उठवल्याने लोकप्रतिनिधींनीही पोर्टल बंद करण्याची मागणी सरकारकडे केली. त्यानुसार मुख्यमंत्री ठाकरे यांनी या पोर्टलला स्थगिती दिली. याबाबत स्टुडंट राईट्‌स संघटनेने 5 ते 10 जानेवारी या कालावधीत समाजमाध्यमावर या पोर्टलविरोधात मोहीम राबवली. तिला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. या मोहिमेद्वारे "एमपीएससी'शी संबंधित प्रश्‍नांवर विद्यार्थ्यांची मते घेण्यात आली. 

राज्यातील 44 हजार 477 विद्यार्थ्यांनी या लिंकवर आपली मते व्यक्त केली. यात राज्य सेवेतील पेपर क्रमांक 2 सी-सॅट हा विषय पात्र करण्यात यावा का, या प्रश्‍नाला 63.9 टक्के उमेदवारांनी "होय' असे; तर 36.1 टक्के उमेदवारांनी "नाही' असे उत्तर दिले आहे. पीएसआय, एसटीआय, मंत्रालय अधिकारी पदासाठी संयुक्त परीक्षा विभक्त करावी का, यावर 80.8 टक्के उमेदवारांनी "होय'; तर 19.2 टक्के विद्यार्थ्यांनी "नाही' हा पर्याय निवडला. तसेच महापरीक्षा पोर्टल रद्द करण्याच्या बाजूने 87.2 टक्के उमेदवारांनी कौल दिला आहे. 



एमपीएससी परीक्षेबाबत समाजमाध्यमाद्वारे घेण्यात आलेल्या या मतचाचणीची आकडेवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे. 
- किरण निमभोरे, प्रमुख 
एमपीएससी स्टुडंट राईट्‌स 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शुक्रवारी शाळा बंद आंदोलन! शिक्षण विभागाकडून वेतन कपातीचा इशारा; शिक्षकांची नेमकी मागणी काय?

उद्या विद्यार्थ्यांनी शाळेत यायचे की नाही? सगळे शिक्षक ‘या’ मागण्यांसाठी शाळा बंद आंदोलनावर; शिक्षण संचालक म्हणाले...

Thane News: युतीधर्माची आठवण अन्...; डोंबिवलीत फोडाफोडीचं राजकारण पुन्हा पेटलं, भाजप आणि शिंदेसेनेत तणाव उफाळला

रिंकू सिंगचा T20 World Cup साठीही पत्ता कट? द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर होताच चर्चेला उधाण

Dhananjay Munde: राज्याचे स्टार प्रचारक धनंजय मुंडे फक्त परळी, गंगाखेडमध्येच का? सोळंकेंनी व्यक्त केली होती नाराजी

SCROLL FOR NEXT