मुंबई

आमचाही बँक बॅलन्स आता झिरोवर, हॉटेल मालकांसह कर्मचाऱ्यांची हृदयद्रावक व्यथा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनच्या काळात सर्वच व्यवहार ठप्प करण्यात आले. यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. अशातच हॉटेल मालकांचाही व्यवसाय ठप्प झाला. राज्य सरकरानं आता पार्सल सेवा सुरु केली असली तरी हवा तसा प्रतिसाद मिळत नाही आहे. याच पार्श्वभूमीवर हॉटेल मालकांनी लॉकडाऊनमुळे कशी परिस्थिती ओढावली आहे हे सांगितलं आहे. गेल्या आठवड्यात मिरची आणि माईम, माडेरा आणि मायमे अनुक्रमे 2015 आणि 2017 मध्ये सुरु केलेले रेस्टॉरंट बंद केल्याचं जाहीर केलं. 

या दोन्ही रेस्टॉरंट्सनं आपल्या ग्राहकांना खूप मनापासून सर्व्हिस दिली. ही चांगली सर्व्हिस देण्यासाठी या रेस्टॉरंटमध्ये 50  speech-and hearing-impaired (SHI) (मुकबधिर आणि अपंग) कर्मचारी काम करत होते. या रेस्टॉरंटमध्ये भारतीय मेनूसह या कर्मचाऱ्यांनी आपुलकीचं एक वातावरण निर्माण केलं होतं. 

लॉकडाऊनमुळे या रेस्टॉरंटची कमाई एप्रिलमध्ये अतिशय वाईट पद्धतीनं कमी झाली. यामुळे त्यांना खूप नुकसान झालं. त्यानंतर त्यांनी पवई येथील ट्रान्सोसन हाऊस, हिरानंदानी गार्डनमधील जागा रिक्त करण्याचा निर्णय घेतला.

पहिल्या दिवसापासून हे रेस्टॉरंट्स पूर्ण भरलेले असायचे. आम्ही मिरची येथे 70 लाख आणि माडेरा येथे 60 लाख रुपये कमवायचो. मार्चमध्ये, जेव्हा आपला महिन्याचा खर्च आधीच झाला होता, तेव्हा आम्ही प्रति आउटलेट 7-8 लाख रुपये कमावले. आमचा दीड कोटी रुपयांचा महसूल 12 लाख रुपयांनी घसरला. त्या महिन्यातच आमचे 1 कोटी रुपयांचे नुकसान झाले, असं राजा शेखर रेड्डी यांनी सांगितलं. ( ज्यांनी शिशिर गोर्ले यांच्या बरोबर स्क्वेअरमेल फूड्सची सह-स्थापना केली.)

एप्रिलमध्ये त्यांनी 170  कर्मचार्‍यांना एका महिन्याच्या पगार दिला आणि कामावर सोडून दिले. त्यावेळी लोक म्हणाले की तुम्ही घाईघाईने निर्णय घेत आहात. आता तेच आम्हाला सांगत आहेत की चांगला निर्णय घेतलात. एखाद्या कर्मचार्‍यासाठी नोकरी गमावणे वाईट आहे मात्र एक नियोक्ता म्हणून आम्ही करू शकलो हे सर्वोत्तम काम आहे, असं रेड्डी म्हणालेत. स्पष्ट बोलायचं झाल्यास लॉकडाऊन होण्यापूर्वी आम्हाला प्रत्येक आउटलेटमध्ये सुमारे 1 कोटी रुपयांचं नुकसान झालं, असंही त्यांनी सांगितलं. प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास आमच्याकडे भविष्यासाठी काहीही योजना नाहीत. आमचा बँक बॅलन्स पूर्णपणे झिरो असल्याचं त्यांनी सांगितलं. 

यशस्वी सुरुवात 

तीन महिन्यांच्या विशेष वर्ग प्रशिक्षण प्रशिक्षणानंतर, 2015 मध्ये जेव्हा मिरची रेस्टॉरंट ट्रायल म्हणून उघडण्यात आलं. त्यावेळी SHI कर्मचारी चिंताग्रस्त होते. सुरुवातील ते व्यवस्थित सर्व्हिस देऊ शकत नव्हते. ऑर्डर घेताना त्यांना अडचणी निर्माण व्हायच्या. मात्र पहिल्या आठवड्याच्या अखेरीस त्यांनी केवळ निरीक्षण केलं आणि त्यानंतर आपली कर्तव्ये चोख बजावली. आमचे दुसरे आउटलेट पूर्णपणे व्हिज्युअल प्रशिक्षणावर आधारित असल्याचं रेड्डी यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : पुण्यात पीएमपीच्या ब्रेकडाऊनमध्ये वाढ, एका महिन्यात २४०० घटना

Health Insurance Updated Rules: आता फक्त २ तास ॲडमिट होऊनही क्लेम करता येणार हेल्थ इन्शुरन्स! जाणून घ्या योजना

Sindhudurg : सोनाली गावडे मृत्यू प्रकरण, ‘ती’ दुसरी छत्री कोणाची? बांदा पोलिसांसमोर गूढ उकलण्याचे आव्हान

Eknath Shinde Delhi Visit : पावसाळी अधिवेशन सुरु असताना एकनाथ शिंदेंचं दिल्ली वारी, अमित शहांसह वरिष्ठ नेत्यांची घेतली भेट, नेमकी काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT