कोरोना व्हायरसच्या संकटाच्या निमित्ताने आरोग्य विमा (हेल्थ इन्शुरन्स) आणि मेडिक्लेमबाबत नागरिकांना खडबडून जाग आल्याचे दिसून येत असून, आरोग्य विमा पॉलिसी घेण्याकडे कल वाढलेला आहे. देशात आरोग्य विमा पॉलिसींबाबत पुरेशी जागरुकता नाही आणि नव्हती. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आज तिचे महत्त्व वाढले आहे. काही विमा कंपन्यांनी खास "कोविड'शी संबंधित पॉलिसी बाजारात आणल्या आहेत आणि त्याबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विचारणा होताना दिसत आहे.
गेल्या महिनाभरात स्टार हेल्थ इन्शुरन्स, आयसीआयसीआय लोम्बार्ड, रिलायन्स जनरल इन्शुरन्स, भारती ऍक्सा हेल्थ इन्शुरन्स, बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स, फ्युचर जनराली इन्शुरन्स आदी कंपन्यांनी खास "कोविड'वर भर देणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण योजना सादर केल्या आहेत. त्यांचा भर शहरीपेक्षा प्रामुख्याने ग्रामीण भागावर अधिक असल्याचे समजते. कारण ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्यविम्याबाबत जागरुकता कमी आहे आणि तेथे असे विमासंरक्षण असलेल्या नागरिकांची संख्याही कमी आहे.
सध्या "लॉकडाउन' आणि त्याचबरोबर घरीच राहण्याचा सल्ला दिला जात असल्याने अनेकजण आरोग्य विमा घेण्यासाठी आपल्या परिचित विमा सल्लागारांना फोन करीत आहेत, तर बरेच जण ऑनलाईन पद्धतीने अशी पॉलिसी घेण्याचा मार्ग स्वीकारत आहेत. याचमुळे ऑनलाईन पद्धतीने आरोग्य विमा पॉलिसी घेण्याचे प्रमाण तब्बल 30 टक्क्यांनी वाढल्याचे चित्र समोर आले आहे. साधारणपणे आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये करबचतीसाठी अनेकजण आरोग्य विमा पॉलिसी घेताना दिसतात. मात्र, यंदा कोरोनाचे संकट लांबल्याने एप्रिलमध्येही अशी पॉलिसी घेण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे.
एखादी पॉलिसी घायची म्हंटलं की आपल्याला अनेक बारीक-सारीक गोष्टी तपासून घ्यायला हव्यात. अशात अनेक वेबसाईट्स या खोट्या किंवा चुकीची माहिती देणाऱ्या असतात. यासाठी तुम्हाला काय काळजी घायला हवी ? पॉलिसी घेताना कोणत्या गोष्टी तपासायला हव्यात ही माहिती तपासण्यासाठी अत्यंत विश्वासार्ह वेबसाईटला भेट द्या.
मेडिक्लेम की खास "कोविड' पॉलिसी घ्यावी?
आपल्याकडे आधीपासूनच सर्वसमावेशक मेडिक्लेम पॉलिसी असेल तर पुन्हा खास कोविडसंबंधित पॉलिसी घेण्याची गरज नसते. कारण आपल्या पूर्वीच्या पॉलिसीत कोविडसह सर्वच आजारांवरील उपचारांचा अंतर्भाव असतो. तुमच्याकडे आरोग्यविम्याचे आधीचे कोणत्याच प्रकारचे कवच नसेल आणि कमी हप्त्यात पॉलिसी हवी असेल तर खास कोविडविषयक पॉलिसीचा तात्पुरत्या काळासाठी विचार करता येऊ शकेल.
हेल्थ इन्शुरन्स व मेडिक्लेम
हेल्थ इन्शुरन्स आणि मेडिक्लेम हे दोन पूर्णतः भिन्न असे आरोग्य विम्याचे प्रकार आहेत. एखाद्या व्यक्तिला जर कोणत्याही वैध कारणांमुळे 24 तासांहून अधिक काळ मान्यताप्राप्त हॉस्पिटलमध्ये राहावे लागले, तर त्यासाठी होणारा खर्च परत मिळवून देणारी विमा योजना म्हणजे "मेडिक्लेम'. हेल्थ इन्शुरन्समध्ये "रायडर' म्हणजे आयुर्विमा पॉलिसीबरोबर दिली जाणारी आजारपणाच्या जोखमीची एक अतिरिक्त पॉलिसी असते. यामध्ये विमा करारात आधी ठरलेल्या आजारांपैकी एखादा आजार उद्भवला किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले तर आधी ठरविलेली रक्कम मिळते. यात प्रत्यक्ष खर्च कितीही झाला तरी आधी ठरविलेली रक्कमच फक्त मिळते.
"आरोग्यविम्याविषयी जागरुकता वाढत चालली आहे. काही कंपन्यांनी "कोविड'शी संबंधित खास विमा पॉलिसी बाजारात आणलेल्या आहेत. त्या अत्यंत कमी हप्त्यात उपलब्ध आहेत. पण आपल्याकडे सर्वसमावेशक मेडिक्लेम पॉलिसी असेल तर त्यात "कोविड'साठीची भरपाईदेखील मिळू शकते.'' - विवेक देशपांडे, विमा सल्लागार
people have become more cautious about their health see what are the changes that are observed
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.