मुंबई

लॉकडाऊन संपले, अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सुरु झाल्या आणि नव्याने त्रास सुरू झाला...

संजय घारपुरे

मुंबई : मुंबईत कोरोना विषाणूचा फैलाव सुरु झाला आणि हळूहळू मुंबईतील दुकाने, कार्यालये, उद्योग, लोकलसेवा बंद केल्या. गेल्या तीन-साडेतीन महिन्यांपासून बंद होत्या. त्यामुळे लोकलचा तसेच लोकलच्या भोंग्याचा आवाज बंद झाला होता. लोकल रेल्वेच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना कमालीचा दिलासा मिळाला होता. आता लॉकडाऊन संपल्यानंतर लोकलची वाहतूक पुन्हा सुरु झाली, तेव्हापासून वांद्रे आणि खार स्थानकाच्या दरम्यान असलेल्या सोसायटीतील रहिवाशांची डोकेदुखी लोकलच्या भोंग्याने वाढली आहे. 

जय भारत सोसायटी वांद्रे तसेच खार स्थानकापासून सारख्याच अंतरावर आहे. दोन्ही स्थानके जवळ असल्यामुळे या दोन्ही स्थानकातून जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकलचा भोंगा कानावर पडणे साहजिकच आहे, पण अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरी सेवा सुरु झाल्यानंतर हा त्रास वाढला असल्याची रहिवाशांची तक्रार वाढल्याचे वृत्त आहे. एवढेच नव्हे तर या भोंग्यामुळे आम्हाला रोजचे कामही करणे अवघड झाले आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

सुरक्षित प्रवासासाठीच भोंगा वाजवला जातो. त्याचा उद्देश कोणालाही त्रास देण्याचा नसतो, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र खूपच कमी उपनगरी सेवा सेवेत असूनही त्यांचा कमालीचा त्रास होतो, असे रहिवासी सांगतात. त्यातील अनेकांनी ट्विटरद्वारे तक्रार करताना त्याचे व्हिडिओही पोस्ट केले आहेत.

लॉकडाऊनपूर्वी एखाद दोनवेळा भोंगा वाजवल्यावर त्यांचा प्रवास सुरु होत असे. मात्र आता वांद्रे आणि खार स्थानकादरम्यान सातत्याने तो वाजवला जात आहे. प्रत्येक लोकल 15 ते 20 सेकंद सतत भोंगा वाजवत असते, असे येथील काही रहिवाशांनी सांगितले. त्यांनी दोन स्थानकात अंतर कमी आहे, तसेच त्या दरम्यान क्रॉसिंग गेटही आहे, पण लॉकडाऊनपूर्वी हे घडत नव्हते. त्याचा त्रास पूर्वी होत नसे, असे त्यांनी सांगितले. 
डॉक्टर अतुल शाह यांनी रुग्ण काय सांगत आहेत, हेही नीट ऐकू येत नाही, असे सांगितले. पहाटेपासून हे भोंगे वाजण्यास सुरुवात होते. ते शंभर डेसिबलहूनही जास्त असतात. आता ट्विटरवरुन तक्रार केलेल्यांना या प्रश्नाकडे लक्ष देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे, पण पश्चिम रेल्वेच्या आधिकाऱ्यांनी लोकल स्टेशनात प्रवेश करताना तसेच त्यातून बाहेर पडताना भोंगा वाजवतात, असे त्यांनी सांगितले.
----
संपादन :  ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Sharma: प्रभासच्या चित्रपटाच्या सेटवर अपघात! बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते राजेश शर्मांना विषारी कीटकाचा दंश; प्रकृती गंभीर

Pune News : अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण अभियंत्याच्या कुटुंबाला दिलासा; विमा नसलेल्या ट्रकच्या मालक-चालकाला भरावी लागणार दीड कोटींची भरपाई

Khed Tehsil Heavy Rain : सतारकावस्तीकडे जाणारा पूल खचल्याने ५०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर संकट

Gas Cylinder : खारपाडा येथे नदीत व खाडीत सिलिंडरचा पूर; हजारो गॅस सिलिंडर पाण्यात आले वाहून, चक्क बोटीने सिलेंडर काढले बाहेर

Pune Investment Scam: बांधकामात गुंतवणुकीचे आमिष; केबल व्यावसायिकाची ४० लाखांची फसवणूक, चतुःश्रृंगी पोलिसांत गुन्हा

SCROLL FOR NEXT