मुंबई

राज्यात पीपीई किट्सच्या विक्रीला परवानगी; मुंबईतील किती दुकानांना मिळाली परवानगी? वाचा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना व्हायरसनं मुंबईत थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा नवी उच्चांकी गाठतो. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर तसंच पीपीई किटची गरज असते. अशातच आता वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई) किटची कमतरता दूर करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने राज्यभरातील 632 दुकानांतून पीपीई किटच्या विक्रीस परवानगी दिली आहे. यापैकी मुंबईत 121 दुकानांदारांना पीपीई किट विक्री करण्याची परवानगी मिळाली आहे. गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक पीपीई किट्सची मागणी करीत आहेत जेणेकरून कोविड -19 पासून स्वतःचा बचाव करत रुग्णांची तपासणी करता येईल.

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पीपीई किट विकणाऱ्या नवीन दुकानांची यादी जाहीर केली आहे. एफडीए मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले की,  ग्रामीण भागातही या किट उपलब्ध करुन देण्यासाठी मंत्रालयाने काही इतर दुकानांना परवानगी दिली आहे.  

या किटांच्या विक्रीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यामध्ये समन्वय साधण्यासाठी तसंच कोणत्याही कमतरतेची खात्री करुन घेण्यासाठी एफडीएने प्रत्येक जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त स्तरावरील अधिकारी नेमले आहेत.

मान्सूनमध्ये आजारांचा वाढता धोका पाहता पीपीई किट खासगी डॉक्टरांसाठी अधिक सहज उपलब्ध व्हाव्यात, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. या महिन्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी खासगी डॉक्टरांना रुग्णालयांवरील भार कमी करण्यासाठी खासगी क्लिनिक आणि दवाखाने पुन्हा सुरू करण्यास सांगितलं. 

पीपीई किट्सच्या अनियमित खर्चाच्या अहवालाला उत्तर देताना शिंगणे म्हणाले की, त्यासाठी केंद्राकडून उत्तेजन आणि धोरण दोन्ही आवश्यक आहेत. पीपीई किटची मूळ किंमत 400 रुपये आहे. मात्र बाजारात पीपीई किट 1,200 रुपयांपर्यंत विकली जातात. कोविडसाठी केंद्रानं इतर गोष्टींच्या किंमतींकरता मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मात्र केंद्राकडून पीपीई किटसाठी कोणत्याही प्रकारच्या किंमती जारी केल्या नसल्याचं शिंगणे यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

SCROLL FOR NEXT