वांद्रे रेल्वेस्थानकाबाहेर जमलेल्या जमावाला आवरताना पोलिस 
मुंबई

तुम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळत नाही... त्रास मात्र पोलिसांना

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सातत्याने एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन केले जात आहे, मात्र त्याचे पालन होत नसल्याने पोलिसांचा जीव मात्र धोक्यात आला आहे. गर्दी केलेल्यांना पांगवण्याची जबाबदारी पोलिसांवर येते. त्यामुळे पोलिसांचे काम जास्तीत जास्त खडतर होत चालले असून त्यांच्यासाठी ते धोकादायकही ठरत आहे. 

मुंबईत आत्तापर्यंत जवळपास साडेसहाशे पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 93 जण बरे झाले आहेत, तरीही धोका कमी झालेला नाही. काही पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित पोलिसांची आकडेवारी बघितल्यास त्यातील सर्वाधिक बाधा दक्षिण आणि मध्य मुंबईत झाली आहे. एकमेकांपासून सुरक्षित अंतर नागरिकांनी राखावे याची जबाबदारी पोलिसांवर आहे आणि त्यासाठी त्यांना त्यांच्या नजीक जाणे  भाग पडत आहे. 

जे जे मार्ग पोलिस ठाण्यातील सर्वाधिक 46 कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. त्या खालोखाल सहार पोलिस ठाण्यातील 26 जण बाधित आहेत. त्याखालोखाल धारावी (19), वडाळा (17), पायधुणी (13), निर्मल नगर (14), वाकोला (12) आदी पोलिस ठाण्यातील संख्याही लक्षणीय आहे. 

कोरोना भयावह होत चालला आहे तरी एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे पालन नागरिकांकडून होत नाहीए. ते मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे त्यांच्याच नव्हे तर इतरांच्या जीवालाही धोका आहे. गर्दी झाल्यावर पोलिसांनाच ती नियंत्रणात आणावी लागत आहे. त्यासाठी त्यांना गर्दीत मिसळावे लागत आहे.  स्थलांतरितांनी रस्त्यावर गर्दी केली तेव्हाही त्यांना तेथून हटवताना त्यांच्याशी आमचा संपर्क आला, याकडे पोलिस आधिकारी लक्ष वेधतात.
गुन्हेगारांमुळेही पोलिसांना लागण होण्याचे प्रमाण मोठे आहे. 

स्पेशल ब्रॅंचलाही संसर्ग
स्पेशल ब्रँचमधील आधिकारीही कोरोनापासून सुटलेले नाहीत. त्यांनाही मुंबईत नियमांचे पालन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सशस्त्र पोलिस दलातील 134 जण बाधित आहेत. सुरक्षा विभागातील 20, गुन्हे अन्वेषण विभागातील 11, शीघ्र कृती दलातील 12 आणि वाहतूक विभागातील 16 जणांना बाधा झाली आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : भारत अन् श्रीलंकेत संरक्षण क्षेत्रातील तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

SCROLL FOR NEXT