fake epass 
मुंबई

खोट्या माहितीच्या आधारे बनावायचे ई-पास; पोलिसांनी चांगलीच घडवली अद्दल..वाचा बातमी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: खोट्या माहितीच्या आधारे जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी ई-पास मिळवून देणा-या दोन चुलत भावांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. आरोपींनी अशा पद्धतीने अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी ई-पास आवश्यक करण्यात आला आहे. त्याचा फायदा घेऊन गरजू लोकांची फसवणूक करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या कक्ष-7 चे पोलिस निरीक्षक मनीष श्रीधनकर यांनी बोगस ग्राहक बनून संशयीत फोन क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी दोन व्यक्तींच्या प्रवासासाठी ई-पासची मागणी केली. 

त्यावेळी आरोपीने कोविड19 चाचणी प्रमाणपत्र, वाहन चालक परवान्याची प्रत , वाहन चालकाचा दूरध्वनी, मोबाईल क्रमांक याची मागणी केली. त्यावेळी श्रीधनकर यांनी आपल्याकडे वैद्यकीय प्रमाणप नसल्याचे सांगितले. त्यावर आरोपीने ई-पास साठी पाच हजार व वैद्यकीय प्रमाणपासाठी एक हजार रुपये दयावे लागतील असे सांगितले. 

संभाषणात आरोपीने एक हजार रुपये आगाऊ रक्कम खात्यावर जमा करण्यास सांगितली. ती रक्कम जमा केल्यानंतर आरोपीने भांडूप येथे एका व्यक्तीकडे ई-पास पाठवून देत असल्याचे श्रीधनकर यांना सांगितले. त्यानुसार गुन्हे शाखेचे उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तेथे सापळा रचला होता.

त्यावेळी कारमधून तेथे एक व्यक्ती आला व त्याने जिल्हाधिकारी पुणे ग्रामीण महाराष्ट्र कार्यालयातील एक ई-पास दिला. त्याच्या बदल्यात पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी सापळा रचून पोलिसांनी अटक केली. त्यावेळी चौकशीत त्याने संपर्क साधण्यात आलेला मोबाईल क्रमांक चुलत भावाचा असल्याचे सांगितले. 

त्यानुसार पोलिसांनी आरोपीच्या भावालाही अटक केली. रविंद्र भय्यूसाहेब धिगे(39) व नामदेव शंकर धिगे(25) यांना अटक केली. रविंद्र हा कल्याण व नामदेव हा भांडूप पश्चिम येथील रहिवासी आहेत. ते घाटकोपर परिसरात कार्यरत होते. आरोपींनी अशा पद्धतीने अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय आरोपींनी ज्या कार्यालयातून पास मिळवला होता. तेथील कोणी कर्मचारी त्यांना मदत करत होता का याबाबत पोलिस तपास करत आहेत.

police arrest  person in fake e-pass case

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Oil India Gas Discovery: कृष्णा-गोदावरी खोऱ्यात ऑइल इंडियाला सापडला नैसर्गिक वायूचा नवा साठा

Motion Sickness: प्रवास करताना मोबाईल किंवा पुस्तक पाहिल्यावर चक्कर येते? डोकेदुखी, मळमळ का होते? पाहा कारणे...

Marathi News Live Updates: नवी मुंबईतील दोन शाळांना बॉम्बची धमकी; विद्यार्थ्यांना घरी पाठवलं

‘ती केवळ आई नाही, आमची आदिशक्ती’; आईबद्दल बोलताना प्राजक्ता माळी म्हणाली, ‘नृत्य शिकण्यासाठी घरातून विरोध, पण…’

Stock Market Crash: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1200 अंकांनी खाली; गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी स्वाहा; कारणं काय? पुन्हा तेजी येणार?

SCROLL FOR NEXT