मुंबई

'व्हिटॅमीन-सी'च्या गोळ्यांचाही होतोय काळाबाजार; ग्राहकांना मोजावी लागतेय अधिक किंमत

मिलिंद तांबे

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'व्हिटॅमीन-सी'च्या गोळ्यांची मागणी वाढली आहे. गोळ्यांची मागणी वाढल्याने दुकानात या गोळ्यांचा तुतवडा निर्माण झाला आहे. परिणामी रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचा काळाबाजार वाढल्याने किंमतीही वाढल्या आहेत. कोरोना आल्यापासून रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या व्हिटॅमीनच्या गोळ्या तसेच औषधांची मागणी वाढली आहे. खास करून 'व्हिटॅमीन -सी'च्या गोळ्यांना मोठी मागणी आहे. मात्र बाजारात सध्या 'व्हिटॅमीन-सी'च्या गोळ्यांचा तुटवडा जाणवतोय. अनेक औषधांच्या दुकानांमध्ये 'व्हिटॅमीन-सी'च्या गोळ्या उपलब्ध नसल्याने इतर औषधं विकत घ्यावी लागत आहेत.

बाजारात सध्या ड्रग्स आणि फूड सप्लिमेंट प्रकारात 'व्हिटॅमीन-सी'ची औषधं मिळतात. सध्या 'व्हिटॅमीन-सी'च्या गोळ्यांचा तुटवडा असल्याने फूड सप्लिमेंटची उत्पादने अधिक विक्रीस आली आहेत. 'व्हिटॅमीन-सी'च्या गोळ्यांची मागणी केली असता वेगवेगळे फूड सप्लिमेंट ग्राहकांना दिले जात आहेत. मात्र, दोन्ही उत्पादनांचा शरीरावर होणारा परिणाम वेगवेगळा असून यामध्ये ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे ऑल फूड एँड ड्रग्स लायसेंस होल्डर फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी दिली.

'व्हिटॅमीन-सी'च्या 30 गोळ्याचे एक पाकिट 35 ते 40 रूपयांना मिळते. मात्र, अनेक ठिकाणी या गोळ्या 120 ते 190 रूपयांना विकल्या जात आहेत. तर फूड सप्लिमेंटच्या तीन गोळ्यांचे पाकीट हे 25 रुपयांना मिळते. 'व्हिटॅमीन-सी'च्या गोळ्यांना मागणी वाढल्याने अनेक कंपन्यांनी आपली वेगवेगळी उत्पादने बाजारात आणली आहेत, मात्र 'व्हिटॅमीन-सी'च्या गोळ्या अधिक परिणामकारक असून त्यांची उपलब्धता अधिक असल्याचे पांडे यांनी सांगितले.

कोरोना संसर्गाच्या निमित्ताने बादारात अनेक उत्पादने आली आहेत. मास्क, सॅनिटायझर, 'व्हिटॅमीन-सी'च्या गोळ्या, वेगवेगळी सेप्लिमेंट पुरवणारी अनेक औषधं बाजारात विकली जात आहेत. या उत्पादकांवर सरकारचं नियंत्रण नसल्याचे दिसते. मात्र यातील कोणते औषध गुणवत्तापूर्ण आहेत, वेगवेगळ्या औषधांमधील नेमका फरक काय याची माहिती ग्राहकाला नसते, त्यामुळे त्याची फसगत होण्याची शक्यता असते. त्यामुळे सरकारने यात लक्ष्य घालून नियंत्रण आणावे, अशी मागणीही पांडे यांनी दिली आहे. 
---
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT