मुंबई

देहविक्री सोडून 'त्यांना' मिळाली स्वावलंबनाची शिकवण; सुरु केला नवा व्यवसाय...

शरद भसाळे

भिवंडी : भिवंडीतील कल्याण रोड, हनुमान टेकडी प्रेमनगर या भागात देहविक्री करणाऱ्या महिलांचे समुपदेशन करत स्वावलंबनाची शिकवण दिल्याने त्यांनी देहविक्री व्यवसायाचा त्याग केला आहे. या महिलांनी एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून घरगुती व्यवसाय सुरू करत सर्वसामान्य जीवन जगण्याचा संकल्प केला आहे. 

त्यासाठी या भागात चार खोल्या भाडे तत्त्वावर घेऊन त्यांनी आपला रोजगार सुरू केला आहे. त्यांच्या याच "चिची हाऊस घर' या रोजगार केंद्राचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (ता.24) वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामुळे येथील महिलांमध्ये जगण्याची व स्वावलंबनाची आशा निर्माण झाली असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

भिवंडीतील हनुमान टेकडी या भागात महिलांकडून मोठ्या प्रमाणात महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय केला जातो. मात्र लॉकडाऊनमुळे या महिलांचा हा व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. ही बाब श्री साई सेवा संस्थेच्या स्वाती खान यांच्या निदर्शनास येताच त्यांनी श्रमजीवी संघटना, तसेच इतर सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून महिलांना अन्न व किराणा धान्य पुरवठा करून त्यांना उपासमारी संकटातून बाहेर काढले. तसेच कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रोजगार असलेला देहव्यापार बंद करावा यासाठी समुपदेशन केले. 

त्यामुळे महिलांनी गेल्या तीन महिन्यांपासून व्यवसाय बंद केला. स्वाती खान यांनी या महिलांना परिसरातील चार खोल्या भाड्याने घेऊन त्यास रंगरंगोटी करून नव्या स्वरूपातील "चिची हाऊस' घर या महिलांच्या ताब्यात दिले. त्याचा लोकार्पण सोहळा शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्या हस्ते पार पडला. या महिलांनी देहव्यापार व्यवसायाचा त्याग करण्याचा निर्णय घेतल्यामुळे, त्या समाजाच्या प्रवाहात येऊन प्रगती करतील, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.

उत्पन्नप्राप्तीसाठी सरकारने आखली नवी योजना; त्यासाठी मुंबईतील 'या' जागेची झालीय निवड?​

सर्वसामान्य जीवन जगण्याचा निर्णय
लॉकडाऊन काळात देहविक्रय करणाऱ्या महिलांची पोटाची भूक भागवण्यासाठी स्वस्थ न बसता स्वाती खान यांनी या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या भूमिकेतून येथील 25 महिलांनी अगरबत्ती पॅकिंग, दिवाळी शोभेची लायटिंग बनविणे या कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबनाचे धडे दिले. हळूहळू या कामातून पैसे मिळायला लागल्याने देहव्यापार करून जीवन व्यतित करणाऱ्या चार महिलांनी देहविक्री बंद करून सर्वसामान्य जीवन जगण्याचा निर्णय घेतला आहे
----
संपादन : ऋषिराज तायडे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: नायरा एनर्जीच्या दरवाढीनंतर सरकारी कंपन्यांचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात 1 लिटरचा भाव किती?

शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याचं धक्कादायक कृत्य! लग्नाच्या भूलथापा देत तरुणीचा ३ वर्ष लैंगिक छळ; तक्रार मिळताच आरोपीला अटक

Pune Teachers Constituency Election : भाजपला मोठा धक्का! पुणे शिक्षक मतदारसंघात डॉ. रोंगे यांचे बंड; विठ्ठलाचं दर्शन घेत अपक्ष म्हणून अर्ज भरण्यासाठी रवाना

Supriya Sule: ‘आधी जनतेला मदत करा, त्यानंतर निवडणुका घ्या’; दुष्काळावरून खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

शेतकऱ्यांनो सावधान! PM Kisanचा 24वा हप्ता येण्याआधी ‘ही’ एक गोष्ट तपासा, नाहीतर लाभापासून मुकाल

SCROLL FOR NEXT