vidyavihar rail roko 
मुंबई

मोठी बातमी : विद्याविहार स्थानकात रेलरोको; विशेष रेल्वेत जागाच नसल्याने कर्मचारी संतप्त

सकाळवृत्तसेवा

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर रेल्वे कर्मचाऱ्यांना कामावर पोहचण्यासाठी शटल सेवा सुरू केली आहे. मात्र, ही गाडी परळ वर्कशॉपमधूनच भरुन येत असल्याने विद्याविहार येथील कारशेडच्या कर्मचाऱ्यांना जागा मिळत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी सायंकाळी 5.30 वाजता रेल्वेरोको आंदोलन केले. एक तासानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्याने शटल रेल्वे कर्जतसाठी रवाना झाली.

मध्य रेल्वे मार्गावर परळ, माटुंगा या ठिकाणी असलेले वर्कशॉप सुरू करण्यात आले आहे. त्यासह विद्याविहार येथील कारशेड सुद्धा सुरू झाले आहे. त्यासोबतच पश्चिम रेल्वे मार्गावरील वर्कशॉप सुद्धा 1 जूनपासून सुरू करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पहिल्या रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या स्थानकांवरच शटल सेवा हाउसफुल होत असल्याने पुढच्या रेल्वे स्थानकांवर कर्मचाऱ्यांना उभे राहायला सुद्धा जागा मिळत नसते. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन कसे करायचे, असा संतप्त सवाल रेल्वे कर्मचाऱ्यांनी विचारला आहे. 

पश्चिम रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचाही प्रवास 
परळ येथून सुटणाऱ्या शटल सेवेमध्ये पश्चिम रेल्वेचे कर्मचारी सुद्धा प्रवास करत असल्याने मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या कर्मचाऱ्यांमुळे ही गाडी परळ रेल्वे स्थानकांवर हाउसफुल होत आहे. त्यामुळे माटुंगा वर्कशॉप आणि विद्याविहार कारशेड येथील कर्मचाऱ्यांना जागाच मिळत नसल्याचा आरोप रेल्वे कर्मचाऱ्यांनी केला आहे.

मोठी बातमी ः आता काय बोलणार! सायन हायवेवर सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा

विद्याविहार येथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे रोको केल्यानंतर मुंबई विभागाचे विभागीय व्यवस्थापकांशी चर्चा करण्यात आली. त्यांनी उद्यापासून रेल्वे कर्मचाऱ्यांची गर्दी लक्षात घेता कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त शटल सेवा सोडण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
- वेणू नायर, सरचिटणीस, नॅशनल रेल्वे मजदूर संघ.
 
अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून सध्या 3 आपत्कालीन रेल्वेगाड्या चालवण्यात येत आहे. यापैकी एक रेल्वेगाडी विद्याविहार स्टेशनवर 5.30 वाजता थांबली होती. त्यानंतर 6.13 मिनिटाने ही रेल्वे कर्जतसाठी रवाना करण्यात आली. ही रेल्वे का थांबवण्यात आली याची चौकशी सुरु आहे. रेल्वेची प्रवासी सेवा हळूहळू सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांना कामावर यावे लागणार आहे. त्यासाठी मुंबई विभाग या तीन गाड्याव्यतीरिक्त अजून एक अतिरिक्त गाडी चालवणार आहे.
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : शेताच्या बांधावर अनवाणी धावणाऱ्या गुलवीर सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास घडवला; ०.०४ सेकंदाच्या फरकाने जिंकले दुसरे पदक

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

SCROLL FOR NEXT