Railway News sakal
मुंबई

Railway News: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; धावणार २८ उन्हाळी विशेष ट्रेन

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी मध्य रात्री १२.४० वाजता पोहोचेल.

सकाळ वृत्तसेवा

रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने २८ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मध्य रेल्वेने १५६ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. त्यामुळे आता मध्य रेल्वेवर उन्हाळी विशेष गाड्यांची संख्या १८४ वर पोहोचली आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०१०७९ सीएसएमटी- मऊ विशेष गाडी बुधवारी १० एप्रिल २०२४ आणि १ मे २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून रात्री १०.३५ वाजता सुटेल आणि मऊ येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ११.१० वाजता पोहोचेल. या अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेनचे आरक्षण सोमवारी ८ एप्रिल २०२४ पासून भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरु झाले आहे.

ट्रेन क्रमांक ०१०८० विशेष गाडी शुक्रवार १२ एप्रिल २०२४ आणि ३ मे २०२४ रोजी मऊ येथून दुपारी १.१० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी मध्य रात्री १२.४० वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक ०१४६३ एलटीटी-कोच्चुवेली साप्ताहिक विशेष ट्रेन ११ एप्रिल २०२४ ते २७ जून २०२४ पर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई दुपारी ४ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ८.४५ वाजता कोचुवेली येथे पोहोचेल.

ट्रेन क्रमांक ०१४६४ साप्ताहिक विशेष कोचुवेली १३ एप्रिल २०२४ ते २९ जून २०२४ पर्यंत दर शनिवारी सायंकाळी ४.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ९.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.(Kasaragod, Kannur, Koshikkod, Tirur, Shoranur, Thrissur, Ernakulam Jn, Kottanam Thiruvalla, Chengannur , Kayamkulam and Kollam Jn.)

एलटीटी-कोच्चुवेली साप्ताहिक विशेष ट्रेन ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, मडगाव जंक्शन, कारवार, कुमटा, कुंदापुरा, उडुपी, मंगळुरु जंक्शन, कासरगोड, कण्णूर, कोषिक्कोड, तिरूर, षोरणूर, त्रिसूर, एरणाकुलम जं, कोट्टानम तिरुवल्ला, चेंगन्नूर, कायमकुलम आणि कोल्लम जं. थांबणार आहे.(Thane, Panvel, Roha, Chiplun, Ratnagiri, Kankavali, Sindhudurg, Sawantwadi Road, Madgaon Junction, Karwar, Kumta, Kundapura, Udupi, Mangaluru Junction.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : मानाचा चौथा तुळशीबाग गणपती बेलबाग चौकात दाखल, पाहा थेट प्रक्षेपण

Pune Metro : गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोचा मोठा निर्णय; रात्री 11 वाजेपर्यंत सलग 41 तास धावणार मेट्रो, प्रवाशांना दिलासा

10,000 कोटींच्या मालकाची बायको, परंतु अभिनेत्री राहिली गटारीशेजारच्या झोपडीत, कारण ऐकून थक्क व्हाल

Chandra Grahan 2025: पितृपक्षाच्या पहिल्याच दिवशी लागणार चंद्रग्रहण, एक दिवस आधीच करा तुळशीशी संबंधित 'ही' कामे

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीच्या कार्यक्रमावर पोलिसांचा ताबा; माजी महापौरांसह महापालिकेचे अधिकाऱ्यांना अडवले

SCROLL FOR NEXT