Railway News sakal
मुंबई

Railway News: रेल्वेच्या व्हिस्टाडोम कोच सुसाट; दीड लाख पर्यटकांचा प्रवास

पुणे - सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये देखील एक विस्टाडोम कोच १० ऑगस्ट २०२२ पासून जोडण्यात आला आहे.

सकाळ वृ्त्तसेवा

Railway News : मध्य रेल्वेवरील व्हिस्टा डोम डब्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. गेल्या दहा महिन्यात मेल- एक्सप्रेस गाड्यामधील विस्टाडोम कोचमधून १ लाख ४७ हजार ४२९पर्यटकांनी प्रवास केला असून त्यामधून २१ कोटी ९५ लाख रुपयांचा महसूल मध्य रेल्वे प्रशासनाला मिळाला आहे.

मध्य रेल्वेचा मुंबई ते गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या आणि धबधब्यांची चित्तथरारक दृश्ये असोत किंवा मुंबई - पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची नयनरम्य दृश्ये असोत, काचेचे टॉप आणि रुंद खिडक्या असलेला व्हिस्टाडोम कोचला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेचा व्हिस्टाडोम कोच हिट ठरले आहेत.

मध्य रेल्वेने एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या दहा महिन्यांत मध्य रेल्वेच्या व्हिस्टाडोम डब्यांमधून सुमारे १,४७,४२९ प्रवाशांनी प्रवास केला असून याद्वारे तब्बल २१.९५ कोटी रुपये महसूल मिळाल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. या विस्टाडोम कोचला मिळणाऱ्या प्रचंड लोकप्रियतेमुळे हे डबे मुंबई - पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये २६ जून २०२१ पासून सुरू करण्यात आले आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मुंबई-पुणे मार्गावरील आणखी दोन विस्टाडोम डबे डेक्कन क्वीनला १५ ऑगस्ट २०२१ पासून आणि प्रगती एक्स्प्रेसमध्ये २५ जुलै २०२२ पासून जोडण्यात आले.तसेच पुणे - सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये देखील एक विस्टाडोम कोच १० ऑगस्ट २०२२ पासून जोडण्यात आला आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार,मुंबई- पुणे- मुंबई डेक्कन एक्स्प्रेस जोडण्यात आलेल्या विस्टाडोम कोच सर्वाधिक प्रतिसाद पर्यटकांनी दिली आहे. २६ हजार २६९ प्रवासीसंख्येसह सर्वात पुढे आहे. त्यानंतर मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस आहे.

विस्टाडोम डब्यांचे वैशिष्ट्ये -

व्हिस्टाडोम डब्यांमध्ये काचेच्या छताशिवाय रुंद खिडक्या, एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट आणि पुशबॅक खुर्च्या, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट डोअर्स, दिव्यांगांसाठी रुंद बाजूचे सरकते दरवाजे, सिरेमिक टाइल फ्लोअरिंग असलेली टॉयलेट इत्यादी अनेक वैशिष्ट्यांसह आकर्षक व्ह्यूइंग गॅलरी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT