File Photo 
मुंबई

राज ठाकरेंचे "लकी 9'च्या मदतीने नवनिर्माण! 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रविवारी (ता.9) बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला. नवी राजकीय भूमिका घेतल्यानंतर मनसेचा हा पहिलाच मोर्चा होता. विशेष म्हणजे हा मोर्चा काढला ती तारीख 9 आहे. राज ठाकरे यांचा शुभ क्रमांक 9 मानला जातो. यामुळे मोर्च्यामध्येही मनसैनिक 9 अंक असलेला टी-शर्ट घालून सहभागी झाले होते. एकूणच राज ठाकरे यांनी आपल्या "लकी नंबर'च्या दिवशी मोर्चा आयोजित केला असल्याची चर्चा सुरू आहे.

राज ठाकरे यांनी आतापर्यंत त्यांची सर्व महत्त्वाची कामे त्यांच्या 9 या "लकी अंका'नुसार केली. राज ठाकरे रविवारी मोर्चासाठी त्यांच्या 9 क्रमांक असलेल्या गाडीतूनच रवाना झाले. इतकेच नाही; तर मोर्चासाठीची तयारीही त्यांनी सकाळी 9 वाजता सुरू केल्याचे समजते. पूर्वी शिवसेनेत असताना असो किंवा मनसेची स्थापना केल्यानंतर असो; राज ठाकरेंचे 9 अंकावरील प्रेम वारंवार दिसून आले आहे. आपल्या मुलाच्या लग्नाच्या निमित्तानेदेखील राज ठाकरेंनी आपला लकी नंबर जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही राज यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात 9 तारखेपासूनच केली होती. पहिल्या सभेच्या मुहूर्तासाठी मनसेने आपला लकी नंबर 9 निवडला होता. मनसेचे महत्त्वाचे निर्णय किंवा एखादा शुभारंभ हादेखील याच अंकाभोवती फिरताना दिसतो. पारशी जिमखाना ते आझाद मैदानापर्यंत काढलेल्या मोर्चादरम्यान रस्त्यावर लावण्यात आलेल्या राज ठाकरेंच्या फलकावरही 9 हा अंक ठळकपणे दिसून आला. या वेळी 9 हा अंक नवनिर्माण करील, असा विश्वास मनसैनिकांनी व्यक्त केला.

ही बातमी वाचली का... हवालदाराचा अपघाती मृत्यू

राज ठाकरेंकडून जय्यत तयारी 
महामोर्चासाठी राज ठाकरे जय्यत तयारीने घराबाहेर पडले. त्या वेळी त्यांनी पहिल्यांदाच आपल्या दंडावर राजमुद्रा असलेला बॅंड धारण केला. कृष्णकुंजवर आलेल्या कार्यकर्त्यांच्या दंडावरदेखील त्यांनी स्वत: राजमुद्रा असलेला बॅंड बांधला. यानंतर पत्नी शर्मिला, मुलगा अमित आणि सून मिताली ठाकरे यांच्यासह राज ठाकरे आपल्या 9 क्रमांकाच्या वाहनाने सिद्धिविनायक मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेऊन सभास्थानाच्या दिशेने रवाना झाले. 

मनसैनिकांकडून 9 क्रमांकाचा बोलबाला 
मनसेच्या वतीने महामोर्चासाठी विशेष टी-शर्ट आणि टोप्या बनवण्यात आल्या होत्या. मनसेने आपल्या झेंड्याचा रंग भगवा केल्यामुळे टोप्यादेखील भगव्या करण्यात आल्या; तर त्यावर शिवमुद्रेचे चिन्ह कोरण्यात आले होते. त्याचप्रमाणे काळ्या रंगाच्या टी-शर्टवर नऊ अंक व भगव्या रंगाची शिवमुद्रा अशा प्रकारचे टी-शर्टदेखील मनसैनिकांनी मोठ्या प्रमाणात घातले होते. राज्यातील जिल्हा आणि शहरातील शहरप्रमुख; तसेच जिल्हाप्रमुखांना हे टी-शर्ट आणि टोप्या मोठ्या प्रमाणात तयार करण्यास सांगण्यात आले होते.

Raj Thackeray Navnirman with the help of "Lucky 9"! 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

Pali News : मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यात चक्क मगरींचा मुक्काम! कामगारांची समयसूचकता अन मगरींना मिळालं नवजीवन

SCROLL FOR NEXT