मुंबई

बलात्काऱ्यांना निष्ठूर आणि कठोर शिक्षा आवश्यक - उच्च न्यायालय

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बलात्काराच्या प्रकरणांमधील दोषी आरोपींना निष्ठुरपणे आणि कठोरात कठोर शिक्षा होणे अत्यावश्‍यक आहे, अशा व्यक्ती समाजासाठीही घातक ठरू शकतात, असे स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या २९ वर्षीय दोषीची सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने कायम ठेवली आहे.

ठाण्यात राहणाऱ्या या आरोपीने शिक्षेविरोधात न्यायालयात अपील याचिका केली आहे. याचिकेवर नुकतीच न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्यापुढे सुनावणी झाली. शेजारी राहणाऱ्या पाच वर्षांच्या मुलीवर मोबाईलमधील गाणी दाखवतो असे सांगून आरोपीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केले; मात्र शेजाऱ्यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी मुलीची सुटका केली. संबंधित मुलीच्या कुटुंबियांनी याबाबत पोलिसांत तक्रार केल्यावर दोषीला अटक करण्यात आली. त्याच्यावर भादंविसह पॉस्को कायद्यानुसारही गुन्हा नोंदवण्यात आला. ठाणे विशेष न्यायालयाने दोषीला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

याविरोधात त्याने अपील केले होते; मात्र ‘आरोपीचे वय पाहता त्याच्या कृत्याचे काय परिणाम होतील याची पूर्ण जाणीव त्याला होती, त्यामुळे तो दयेस पात्र नाही आणि त्याच्या सुधारण्याचीही अपेक्षा नाही’, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. सुशिक्षित समाजासाठी अशा व्यक्ती घातक ठरू शकतात, असे ठणकावत न्यायालयाने आरोपीचे अपील नाकारले आणि त्याची शिक्षा कायम ठेवली.
 रस्त्यावरील दिव्यांमुळे या पालिकेची झाली लाखोची बचत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT