File Photo 
मुंबई

या कारणामुळे मोबाईलचे वापरणाऱ्यांची संख्या घटली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, : देशात दोन वर्षांपासून असलेले मंदीसदृश वातावरण आणि मोबाईल कंपन्यांनी केलेल्या दरवाढीमुळे मोबाईलचे प्रत्यक्ष वापरकर्ते (सिमकार्डांची संख्या) घटल्याची आकडेवारी टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटीने (ट्राय) प्रसिद्ध केली आहे. गत आठ वर्षांत प्रथमच हे संकट ओढवले आहे.

यापूर्वी २०१२ मध्ये मोबाईलधारकांची संख्या कमी झाली होती, मात्र सिमकार्डांची संख्या २००९ नंतर कधीही घटली नव्हती. प्रत्यक्ष मोबाईल वापरकर्त्यांची संख्या गेल्या १० वर्षांत प्रथमच २०१९ मध्ये घटल्याचा अंदाजही ट्रायने व्यक्त केला आहे. मागील वर्षी ऑक्‍टोबरमध्ये मोबाईल वापरकर्त्यांची संख्या २०१८ च्या तुलनेत चार टक्‍क्‍यांनी कमी झाली होती.

देशात २०१८ मध्ये एक अब्ज दोन लाख मोबाईल जोडण्या होत्या; ही संख्या २०१९ मध्ये ९८ कोटी १० लाख झाली. हाच कल २०२० मध्येही कायम राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सर्व मोबाईल कंपन्यांनी आता दरवाढ केली आहे. डिसेंबरमध्येच एअरटेल, व्होडाफोन, आयडिया व जिओ यांनी प्री-पेड दरात १४ ते ३३ टक्के वाढ केली.

किमान रिचार्जचा किंमतपट्टाही ३५ रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत वाढवण्यात आला. ही दरवाढ तीन वर्षांनंतर झाल्याने मोबाईलधारकांना फटका बसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दोन वेगळ्या कंपन्यांची सिमकार्ड असलेल्या वापरकर्त्यांना आपला क्रमांक ‘पोर्ट’ करूनही फारसा फायदा होणार नाही. व्होडाफोन व आयडिया या कंपन्यांच्या विलीनीकरणानंतर दर किती होतील, याकडेही वापरकर्त्यांचे लक्ष आहे. 

मोबाईल कंपन्यांनी मागील वर्षी केलेली दरवाढ (रिचार्ज पॅकेज आणि कॉलच्या दरांत वाढ) व फोर-जी जोडणीसाठी मोजावे लागणारे जादा पैसे यामुळे मोबाईल वापराचा खर्च वाढत चालला आहे. परिणामी पूर्वी दोन-तीन मोबाईल बाळगणाऱ्या व्यक्ती आता एकच मोबाईल वापरण्याच्या मन:स्थितीत आहेत. एकाच मोबाईलमध्ये दोन सिमकार्ड वापरणारेही एक सिमकार्ड रद्द करत आहेत. या कारणांमुळे मोबाईल वापरकर्त्यांची संख्या कमी होत आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ रोहन धमिजा यांनी सांगितले.

फोर-जीकडे वाढता कल
टू-जी व थ्री-जी प्रकारच्या दोन सिमकार्डऐवजी एकच फोर-जी सिमकार्ड घेण्याकडेही मोबाईल वापरकर्त्यांचा कल आहे. डिसेंबर २०१९ च्या अखेरीस देशात फारशी वापरात नसलेली २५ कोटी दुहेरी सिमकार्ड होती. स्मार्टफोनचा वाढता खप पाहता २०२० मध्ये फोर-जी सिमकार्डधारकांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे.

The recession has reduced mobile users

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT