मुंबई

मुंबईकरांना दिलासा; कोरोना रुग्णदुपटीचा दर 80 दिवसांवर, जाणून घ्या आजची आकडेवारी...

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईतील कोरोनाचा संसर्ग हात टप्प्याटप्प्याने कमी होत असल्याचे दिसत आहे. हळूहळू मुंबईतील कोरोनाच्या रुग्णवाढीचा दरही वाढत असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. दरम्यान, मुंबईत मंगळवारी(ता.5) 1,125 नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 1,19,255 झाली आहे. तर आज 42 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 6,588 वर पोचला आहे. मुंबईत आज 711 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 77 टक्के इतका आहे.                                            

मुंबईत आज नोंद झालेल्या 42 मृत्यूंपैकी 31 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 30 पुरुष तर 12 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी  24 रुग्ण 60 वर्षा वरील होते तर 18 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबईत संशयित रुग्ण आढळणे सुरूच असून आज एकूण 671 नवे संशयित रुग्ण सापडले असून आतापर्यंत 84,644 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 711 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 91,673 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 80 दिवसांवर गेला आहे. तर 4 जुलै पर्यंत एकूूूण 5,67,031  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर  29 जुलै ते 4 ऑगस्ट जुलै दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 0.87 इतका आहे. 

सामनाच्या फ्रंट पेजवरील सूचक जाहिरात म्हणतेय, "हे ज्यांनी केले, त्यांचा मला अभिमान आहे !"

साडेपाच हजार इमारती सील
मुंबईत 621 इमारती आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 5,609 असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 3,518 अति जोखमीचे रुग्ण आहेत तर 4,296 रुग्ण कोविड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत.
---
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Germany Hanau Ganesh Festival: हानाऊमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह; जर्मनीच्या विविध राज्यांतील भारतीय समुदाय एकत्र

Saudi Arabia: सौदी अरेबियाला मदिनामध्ये सापडला 110 दशलक्ष टन युरेनियमचा प्रचंड साठा, इराणशी तणाव अन् अमेरिकेशी अणुकरार

SCROLL FOR NEXT