मुंबई

दिलासादायक ! अन्न आणि निवारा नसलेल्यांसाठी मुंबईत आजपासून सुरु झालाय हक्काचा निवारा

सकाळवृत्तसेवा

मुंबई: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन जारी करण्यात आलाय. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. कोरोनापासून देशातल्या विविध शहरांमधील बेघर असलेल्या आणि आपल्या घरी जाऊ इच्छिणाऱ्या लोकांची काही दिवसांपूर्वी मुंबईतील स्थानकांवर बस स्टॅन्डवर गर्दी झाली होती. अशात लॉकडाऊनमुळे अनेक नागरिक आपापल्या घरी पोहोचलेले नाहीत. 

मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस LTT वर अशा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी  केली होती. नागरिकांना अन्न आणि निवारा मिळणं खूप अवघड झालं होतं. लोकांना रस्त्यावर यावं लागतं आहे. अशा लोकांची अन्नाची आणि राहण्याची वानवा होताना पाहायला मिळतेय. 

अशा सर्व नागरिकांना मदत करण्यासाठी आज म्हणजेच २ एप्रिलपासून राज्य शासनाच्या सिव्हिल डिफेन्स विभागानं मुंबईतील वर्सोवा इथे  एक कॅम्प आयोजित केला आहे. या कॅम्पमध्ये या स्थलांतरितांची, बेघर लोकांची आणि कामगारांच्या निवाऱ्याची आणि अन्नाची सोय  करण्यात आलीये.

कॅम्पमध्ये काय असतील सुविधा:

  • या कॅम्पमध्ये रस्त्यावर वास्तव्य करणारी मंडळी, निराधार आणि कुठलाही निवारा नसलेले कामगार आणि मजूर यांना या कॅम्पमध्ये ठेवण्यात येणार आहे.
  • इथे ठेवण्यात येणाऱ्या नागरिकांना अन्न व निवारा मिळणार आहे.
  • बृहन्मुंबई महापालिकेतर्फे या वर्सोवा कॅम्पला पाणी टॉयलेटची व्यवस्था करण्यात येणार आहे
  • अन्न आणि इतर वस्तूंचा पुरवठा स्वयंसेवी संस्थांमार्फत करण्यात येणार आहे.
  • कॅम्पमध्ये स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन कसोशीने करण्यात येणार आहे.
  • जुहूच्या इस्कॉन संस्थेतर्फे सिव्हिल डिफेन्स कार्यकर्त्यांमार्फत इथल्या लोकांना अन्न पुरवण्यात येणार आहे.
  • लोकांना वास्तव्य करता यावे म्हणून येथे सतरंज्या ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक सतरंजीच्या मध्ये पाच फुटांचे अंतर राखण्यात आले आहे.
  • इथे राहणाऱ्यांना पाणी, अंघोळ आणि स्वच्छतागृह यांची सुविधा मिळेणार आहे.
  • कॅम्प साधारणपणे २२ हजार स्क्वेअर फुटाच्या परिसरामध्ये लावलेल्या तंबूंमध्ये असणार आहे.
  • येत्या काही दिवसांमध्ये या कॅम्पचा विस्तार करण्यात येणार आहे.

याबाबतची माहिती शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी आणि महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात हा कॅम्प म्हणजे बेघर आणि स्थलांतरित लोकांसाठी स्वतःच घर असणार आहे.

relief camp starts in versova mumbai durind crisis scenario of novel corona virus covid19

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction live : मुंबई इंडियन्सची स्वस्तात मस्त डील! रोहित शर्माला तगडा ओपनिंग पार्टनर मिळाला, झाली घरवापसी; चिंता मिटली

Mumbai News: कायदा पोलिसांना लागू नाही का? उच्च न्यायालयाचा सवाल; केंद्राला भूमिका स्पष्‍ट करण्याचे आदेश

IPL 2026 Auction: वेंकटेश अय्यरची किंमत तब्बल १६.७५ कोटींनी झाली कमी! माजी विजेत्यांनी केलं खरेदी

IPL 2026 Auction live : खिशात नाही दाणा अन्... ! Mumbai Indians च्या खेळीने सारे चक्रावले; CSK च्या रणनीतीने KKR चा खिसा कापला...

Latest Marathi News Live Update : अरूप बिस्वास यांची ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून क्रीडा मंत्री पदावरून मुक्त करण्याची विनंती

SCROLL FOR NEXT