सिग्नल शाळेत उभारण्यात आलेली रोबोटिक लॅब 
मुंबई

एक नंबर ! ठाण्यातील सिग्नल शाळेची 'रोबोटिक' भरारी...

शर्मिला वाळुंज

ठाणे : आपल्या देशाने गेल्या काही वर्षांत विज्ञान-तंत्रज्ञानात आणि अवकाश क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील पुढील पायरी म्हणजे "रोबोटिक सायन्स' आहे. ठाण्यातील बहुचर्चित सिग्नल शाळेतील मुले या शिक्षणापासून वंचित राहू नयेत, त्यांना पहिलीपासूनच शास्त्रशुद्ध रोबोटिकचे ज्ञान मिळावे, यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधत येथील सिग्नल शाळेत रोबोटिक लॅब सुरू करण्यात आली आहे. फक्त रोबोटिक शिकविणारी ही पहिली शाळा ठरणार आहे. शुक्रवारी, सकाळी 10 वाजता खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते या लॅबचे उद्‌घाटन होणार आहे. 

ठाणे तीन हात नाका येथील सिग्नल शाळा ही गेल्या चार वर्षांपासून सिग्नलवरील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रयत्न करीत आहे. विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना अद्ययावत शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने उपक्रम राबविण्यात येतात. गेल्या वर्षी सुसज्ज अशी विज्ञान प्रयोगशाळा शाळेत उभारण्यात आली. त्याचे फलित म्हणून राज्यस्तरीय विज्ञान संमेलनात मुलांनी सातवा क्रमांक पटकावला आणि शाळेची दोन मुले इस्त्रो भेटीसाठी निवडण्यात आली.

विज्ञान-तंत्रज्ञान शिक्षणातील पुढील टप्पा म्हणून 'रोबोटिक सायन्स'चे शिक्षण मुलांना मिळावे यासाठी सिग्नल शाळेत स्वतंत्र रोबोटिक लॅब उभारण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी खासदार सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते या लॅबचे उद्‌घाटन होईल. यावेळी महापौर नरेश म्हस्के, शिक्षण विभाग सभापती विकास रेपाळे हेही उपस्थित राहाणार आहेत. 

लॅबमध्ये काय शिकता येणार 
"एसबीआय लाईफ इन्शुरन्स' यांच्या सहकार्याने ही लॅब सुरू होत असून, रोबोटिक्‍स प्रोग्रामिंग करणे, प्रत्यक्ष रोबो तयार करणे आदी शिक्षण मुलांना रोबोटिक लॅबमधून मिळणार आहे. रोबोटिक शिक्षणाचा वर्षभराचा स्वतंत्र अभ्यासक्रम "चिल्ड्रन टेक सेंटर'ने यासाठी तयार केला आहे. इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व मुलांना यामुळे रोबोटिक शिकायला मिळणार असल्याची माहिती समर्थ भारत व्यासपीठचे भटू सावंत यांनी दिली.

 'Robotic lab' in Thane Signal School's  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजार सौम्य वाढीसह तेजीत; मात्र आयटी निर्देशांक लाल रंगात; आज कोणते शेअर्स वाढले?

'चित्रपटांपेक्षा पॉपकॉर्न महत्त्वाचा!' मराठी सिनेमांसाठी मिळणाऱ्या कमी स्क्रीनबाबत माधुरी दीक्षितने व्यक्त केली खंत

Overeating Control Tips: न्यू इअर पार्टीनंतर पोट बिघडतंय? ओवरइटिंग टाळण्यासाठी ‘हे’ उपाय नक्की करा

RRB Group D Recruitment 2026: नवीन वर्षात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! RRB ग्रुप डीमध्ये 22 हजार पदांसाठी भरती लवकरच ; पात्रता व निवड प्रक्रिया वाचा

Vijay Hazare Trophy : रोहित शर्माच्या सुरक्षेत मोठी चूक; बॉडिगार्डना चकवून 'तो' हिटमॅनजवळ पोहोचला अन्... माजी कर्णधार चिडला Video

SCROLL FOR NEXT