मुंबई

देव तारी त्याला कोण मारी! 'रोसाई डॉर्फमन' दुर्मिळ आजाराने ग्रस्त 20 वर्षीय श्रुतीवर यशस्वी उपचार

भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा

मुंबई - रोसाई डॉर्फमन या दुर्मिळ आजाराने त्रस्त असलेल्या 20 वर्षीय श्रुतिला नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयातील डाॅक्टरांनी उपचार करुन जीवदान दिलं आहे. नवी मुंबई येथे राहणाऱ्या श्रुतीला अंधूक दिसणे, उजवा डोळा तिरळा होणे (इसोट्रॉपिया), कोणत्याही वस्तूच्या दोन प्रतिमा दिसणे (डिप्लोपिया) आणि 20 दिवसांपासून सुरू असलेली तीव्र डोकेदुखी हे त्रास होत होते. तिच्या कुटुंबियांनी अपोलो रुग्णालयात श्रुतिला दाखल करून उपचार घेण्याचा निर्णय घेतला.

रुग्णालयात केलेल्या प्राथमिक तपासणीत तिला वाचायला येत नसल्याचे, तसेच उजव्या डोळ्याने एखादा चेहराही ओळखू येत नसल्याचे आढळून आले. श्रुतीची ‘एमआरआय’ तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ‘इन्फिल्ट्रेटिंग एन्हान्सिंग सॉफ्ट टिश्शू मास लेशन’ असल्याचे दिसून आले. ‘सीटी गाईडेड बायोप्सी’ आणि ‘इम्युनोहिस्टो केमिस्ट्री’ या चाचण्याही करण्यात आल्या. त्यातून श्रुतीच्या आजाराचे निदान निश्चित झाले. तिला ‘रोसाई डॉर्फमन’ हा आजार (आयएचसी: S-100, CD-68 Expressed) झाला होता. हा आजार असलेल्या रुग्णांमध्ये ‘लिम्फाडेनोपथी’ वाढलेली आढळते (ही लिम्फ नोड्सची एक स्थिती आहे, यामध्ये हे नोड्स विचित्र पद्धतीने वाढतात). तसेच ताप, न्यूट्रोफिलिया, ल्युकोसिटॉसिस (पांढऱ्या रक्तपेशी वाढणे), ‘इएसआर’ मध्ये वाढ आणि ‘पॉलिक्लोनल गॅमोपॅथी’ ही लक्षणे आढळतात. हा अतिशय दुर्मिळ स्परुपाचा आजार असून 1969 पासून आतापर्यंत जगात या आजाराचे 1000 पेक्षाही कमी रुग्ण आढळून आलेले आहेत.

.....

भारतात फक्त चार रुग्ण- 

सीटी गाईडेड बायोप्सीमुळे आम्हाला आजाराचे अचूक निदान करता आले. भारतातील ही केवळ चौथी केस होती. खरे तर हा आजार महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आढळतो, मात्र तो 20 वर्षांखालील कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो. या केसमध्ये, सतत डोके दुखत असल्याची रुग्णाची तक्रार होती. तसेच दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळापासून कोणतीही वस्तू अंधूक आणि दुहेरी प्रतिमांमध्ये दिसत असल्याचीही तिची तक्रार होती. ही परिस्थिती आणखी वाईट होण्याची दाट शक्यता होती. 

डॉ.अनिल डीक्रूज, डोके-मान कर्करोगावरील तज्ज्ञ, ऑन्कॉलॉजी विभाग संचालक, अपोलो रुग्णालय 

काय आहे हा आजार ? 


रोसाई डॉर्फमन हा सौम्य स्वरुपाचा विकार असल्याचे समजले जाते. शिवाय, तो कधीकधी अतिशय तीव्र स्वरुप धारण करतो आणि त्यावेळी त्यातून विकृती निर्माण होते किंवा रुग्ण दगावण्याची शक्यता असते. ‘रोसाई डॉर्फमन’ या आजाराच्या उपचारांबाबत मार्गदर्शक तत्वे उपलब्ध नाहीत. या आजाराची लक्षणे दिसून आली नाही, तर तो आपोआप बरा होतो, असे ५० टक्के केसेसमध्ये दिसून आले आहे. मात्र, श्रुतीच्या बाबतीत त्या पर्यायाचा विचार करता येत नव्हता. तिच्या डोळ्यावर परिणाम होऊन तिची दृष्टी कायमची गेली असती आणि तिला ‘इन्ट्राक्रॅनिअल एक्स्टेंशन’ झाला असता. शस्त्रक्रिया हा पर्याय असला, तरी आजाराची जागा आणि त्याची तीव्रता लक्षात घेता, तो आम्हाला उपलब्ध नव्हता. औषधोपचारही निश्चित नाहीत. अशा वेळी ‘कोर्टिकोस्टेरॉईड्स’ (प्रेडनिसोलोन), ‘व्हिन्का अल्कलॉईड’ आणि ‘5-एफयू’ यांची केमोथेरपी, ‘इंटरफेरॉन’ ची लहान मात्रा आणि अॅंटीबायोटिक उपचार हाच पर्याय आमच्यासाठी शिल्लक राहिला. रुग्णावर आम्ही ‘स्टेरॉईड्स’ चे उपचार सुरू केले आणि त्यातून उत्तम प्रतिसाद मिळाला.


डॉ. सलील पाटकर, मेडिकल ऑन्कॉलॉजी कन्सल्टंट, अपोलो रुग्णालय 

--------------------------------------------------

Edited by Tushar Sonawane 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

मोठी बातमी : भारत-बांगलादेश मालिका स्थगित; रोहित शर्मा, विराट कोहली यांना ऑक्टोबरपर्यंत मिळाली सुट्टी

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

SCROLL FOR NEXT