मुंबई

संजय राऊत म्हणालेत 'ते' तर आमचे उपमुख्यमंत्री..

सकाळ वृत्तसेवा

संजय राऊत. बस नाम ही काफी है.. याची प्रचीती आपल्या सर्वांना विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालानंतर आली. शिवसेनेकडून अधिकृतपणे भाष्य करणारा एकाच चेहरा म्हणजे संजय राऊत. याच संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलता बोलता एक अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केलंय. 

महाराष्ट्रात सध्या विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या अगदी काही दिवस आधी महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत शपथ घेतलेल्या सहा मंत्र्यांमध्ये खातेवाटप करण्यात आलं. यामध्ये 22-13-12 चा नवा फॉर्म्युला महाराष्ट्राला पाहायला मिळाला. मात्र या सर्वात जास्त चर्चा सुरु होती ती महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची सूत्र कुणाच्या हातात येणार याची. 

थोडं मागे जाऊ. अजित पवार यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप आलेला पाहायला मिळाला. तीन दिवसांनी अजित पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि संख्याबळ नसल्याने देवेंद्र फडणवीस यांनी देखील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. 

यानंतर चर्चा सुरु झाल्या त्या अजित पवारांच्या राजकीय भविष्याच्या. अजित पवार राजकीय सन्यास घेणार अशा देखील बातम्या पसरल्या गेल्यात. मात्र तसलं काहीही होताना पाहायला मिळालं नाही. अशातच अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात देखील क्लीन चीट मिळाली आहे. आज शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ संजय राऊत यांनी अजित पवार यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलंय.  

अजित पावार 'ते' तर आमचे होणारे डेप्युटी सीएम आहेत, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय. 

अजित पवार यांनी या आधी देखील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार सांभाळला आहे. आता अजित पवार जर महाराष्ट्राचे पुन्हा उपमुख्यमंत्री झालेत तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकरी कर्जमाफीबद्दल काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

WebTitle : sanjay raut says ajit pawar will is our furuture deputy CM 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT