मुंबई

दहावीत पास, पण कॅन्सरच्या परीक्षेत नापास; टाटा रुग्णालयातून परीक्षा देत 'तिने' मिळवले तब्बल 'इतके' गुण

तेजस वाघमारे

मुंबई : कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी लढत मलिका सगीरा जेद अली हिने टाटा रूग्णालयातून दहावीची परीक्षा दिली. दहावी निकालात या विद्यार्थिनीने तब्बल 73.40 टक्के गुण मिळवत मोठे यश मिळवले. मात्र, हे यश पाहण्यास ही विद्यार्थिनी आज या जगात नाही. कॅन्सरसोबत सुरु असलेली लढाई ती हरली आहे. या विद्यार्थिनीच्या परीक्षेची विशेष व्यवस्था मुंबई विभागीय मंडळातील अधिकाऱ्यांनी केली. दहावीत उत्कृष्ठ यश मिळवलेली मलिका आयुष्याच्या परिक्षेत नापास झाल्याने शिक्षण विभागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

वांद्रे येथील सेंट माऊंट मेरी कॉन्व्हेट स्कूलची विद्यार्थीनी मलिका सगीरा ही कॅन्सरबाधित होती. ती परीक्षेवेळी परळ येथील टाटा रूग्णालयात उपचार घेत होती. परीक्षेसाठी तिला माहिम येथील कनोसा हायस्कूल शाळा परीक्षा केंद्र आले होते. परंतु काही पेपर दिल्यानंतर तिचा आजार अधिक वाढल्याने तिला परीक्षा केंद्रावरही जाणेही अवघड झाले होते. त्यामुळे मलिका सगीरा हिने मुंबई विभागीय शिक्षण मंडळाकडे मला रुग्णालयातून परीक्षा देण्याची मुभा देण्याची द्यावी, अशी विनंती केली हेाती. 

त्याला मंडळाने तात्काळ प्रतिसाद देत तिला परीक्षा परळच्या टाटा रुग्णालयातून दिली होती. त्यासाठी  मंडळाने तातडीने या विद्यार्थीसाठी परीक्षक, एक महिला पोलिस, एक रायटर आणि तिच्यासाठी खास पेपरचा गठ्ठा शिक्षकांसोबत पाठविण्याची सोय मंडळाने केली होती. शिक्षण मंडळाच्या इतिहासात पहिल्यादांच अशा प्रकारे रुग्णालयात परीक्षा देण्याची मुभा मलिका सगीरा हिच्या माध्यमातून मिळाली हेाती.

दहावी परीक्षेत तिने 367 गुण मिळवले असून ते 73.40 टक्के इतके आहेत. मलिका सगीरा हिने दहावीच्या परीक्षेत कॅन्सरचा मुकाबला करत ही परीक्षा पास होण्याचे ध्येय पूर्ण केले मात्र तिला निकाल पाहता आला नाही. तिचे नुकतेच निधन झाले आहे. त्यानंतर तिचे आई-वडिल आपल्या मूळ गावी कोलकात्याला गेले असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली. मंडळातील अधिकाऱ्यांनी हि तिच्या निधनाला दुजोरा दिला आहे.
----
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दराबाबत मोठी अपडेट! आज तुमच्या शहरात किती रुपयांना मिळतंय 22 कॅरेट सोनं?

ACB Action in Kadegaon : कडेगावात लाचलुचपतचा मोठा दणका! निकाल बाजूने लावण्यासाठी सहा हजारांची लाच मागणारा मंडल अधिकारी जाळ्यात

'काजोलसारखी दिसणारी दुसरी बाई माझ्यासमोर उभी केली आणि...' देवेंद्र गायकवाडने सांगितला 'तान्हाजी'मधील किस्सा, म्हणाला...

Latest Marathi News Live Update : रुपाली चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी

Sandeep Deshpande : "मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ", संदीप देशपांडेंची टीका

SCROLL FOR NEXT