मुंबई

दुकानदारांना मिळाला सायंकाळचा वाढीव एक तास, दुकाने सुरु ठेवण्याच्या नव्या वेळा वाचा

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कोरोनाला आळा घालण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील दुकानांना सायंकाळी 7 पर्यंतच्या वेळेचे बंधन घालण्यात आले होते. दुकानदारांना सातची वेळ व हॉटेल, बार व्यावसायिकांना रात्री 11 पर्यंतची वेळ दिल्याने व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण होते.

सात पर्यंतच्या निर्णयाचा पुर्नविचार करा, दुकानांना रात्री 9 पर्यंतची वेळ द्या अशी आक्रमक भूमिका व्यापाऱ्यांनी घेतल्यानंतर अखेर पालिका प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या भूमिकेपुढे नमते घेत सकाळी 10 ते रात्री 8 असा वेळेत बदल करावा लागला. यामुळे व्यापाऱ्यांना सायंकाळच्या वेळेत वाढीव एक तासाचा दिलासा मिळाला आहे.

सोमवारी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दुकानांच्या वेळेत बदल केल्याचे आदेश नव्याने जारी केले. पी 1, पी 2 रद्द करण्याची मागणी मात्र अद्याप प्रलंबित असून त्यावर काय विचार केला जातो याकडे आता व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिका क्षेत्रात पालिका प्रशासनाने गुरुवारपासून निर्बंध लागू केले आहेत. त्या निर्बंधानुसार परिसरातील दुकानांना सकाळी 7 ते सायंकाळी 7 अशी वेळ ठरवून देण्यात आली आहे.

परंतू दूसरीकडे शहरातील हॉटेल, बार, रेस्टॉरंट यांना मात्र रात्री 11 पर्यंतची मुभा देण्यात आली. यानिर्णयामुळे व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण होते. पालिकेच्या या निर्णयाला विरोध दर्शवित व्यापाऱ्यांनी शुक्रवारी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांची भेट घेत सातच्या निर्णयाचा पुर्नविचार करण्याची मागणी केली होती.

तसेच शनिवार रविवार पी 1 व पी 2 प्रमाणे दुकाने सुरु राहतील हा निर्णय रद्द केला जावा अशी मागणी देखील व्यापाऱ्यांनी केली होती. शनिवार रविवार दुकाने सर्रास उघडी ठेवल्याने पालिका प्रशासन आणि व्यापारी यांच्यात वादाचेही प्रसंग उद्भवल्याचे पहायला मिळाले.

सोमवारी आयुक्तांसोबत व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी राकेश मुथा, दिनेश गौर, दिलीप कोठारी यांसह काही व्यापाऱ्यांनी चर्चा केली. यावेळी चर्चेत सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेपेक्षा सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंतची वेळ देण्याविषयीच्या चर्चेवर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. त्यानुसार सायंकाळी तसे निर्देश जारी केल्याची सूचना आयुक्तांनी केली.

पी 1, पी 2 बाबत निर्णय नाही

शनिवार - रविवार पी 1, पी 2 प्रमाणे दुकाने सुरु ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. हा निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. याविषयी मात्र कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. पोलिस यंत्रणा, प्रभाग अधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्याविषयीचा निर्णय घेतला जाईल असे पालिका प्रशासनाचे म्हणने आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची ही मागणी अद्याप प्रलंबितच आहे.

दुसऱ्यांदा आयुक्तांना निर्णयात करावा लागला बदल

कोरोना काळात आयुक्त विजय सूर्यवंशी काही धडाडीचे निर्णय घेतले खरे, परंतू नागरिकांच्या रोष पहाता त्यांना आपल्या निर्णयात दोनदा बदल करावा लागला आहे. मागीलवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण डोंबिवलीतून मुंबईला कामासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा शहरात प्रवेश देण्यास मनाई करण्याचा आदेश मे महिन्यात काढला होता. नागरिकांनी याविषयी रोष व्यक्त केल्याने 24 तासास पालिका आयुक्तांनी त्या मनाई आदेशाला स्थगिती दिली होती.

त्यानंतर यावर्षी पुन्हा कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत कोरोनाची संख्या वाढत असताना, पालिका आयुक्तांनी दुकानांना सकाळी 7 ते रात्री 7 ची वेळ दिली होती. परंतू हॉटेल, बार, रेस्टॉरंट आणि दुकानदार यांना वेगवेगळ्या वेळा दिल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी दर्शविली होती. त्यानुसार आयुक्तांनी दुकानांच्या वेळेत बदल करीत निर्णयात बदल केल्याचे दिसून आले. 

shopkeepers got one extra hour now shops will be open till 8 pm amid rising numbers of covid

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजांचा कडकडाट अन् वादळी वाऱ्याचा तडाखा! कोकण, विदर्भ, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांत मुसळधारेचा इशारा

IND vs AFG 3rd T2OI: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... श्रेयस अय्यरने Playing XI मध्ये केलाय एक बदल; जाणून घ्या संघ

72-Year-Old Paragliding : आजोबांनी Gen-Z लाही लाजवलं ! वयाच्या ७२व्या वर्षी घेतली आकाशात झेप, २४ हजार फूट उंचीवरून पॅराग्लायडिंग, VIDEO VIRAL

Latest Marathi News Update : नागपूरच्या अजनी चौकात ‘आशीर्वाद का दीया’ अभियान; दीपोत्सवाला मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

Lightning Strike Tragedy: सिल्लोडच्या दहिगावात शेतातील झोपडीवर वीज कोसळून पती-पत्नीचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT