son commits suicide murdering mother crime police unemployed mumbai sakal
मुंबई

Crime News : "बेडरूममध्ये आईचा मृतदेह; बाहेर मुलाचा गळफास", विक्रोळीत आईचा खून करून मुलाची आत्महत्या

आईची हत्या करून 22 वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याची ही धक्कादायक घटना रविवारी विक्रोळीच्या कन्नमवार नगरात घडली

सकाळ वृत्तसेवा

आईची हत्या करून 22 वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याची ही धक्कादायक घटना रविवारी विक्रोळीच्या कन्नमवार नगरात घडली

मुंबई : आईची हत्या करून 22 वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याची ही धक्कादायक घटना रविवारी विक्रोळीच्या कन्नमवार नगरात घडली आहे. 54 वर्षीय उमा तावडे यांची त्यांचा मुलगा अभिषेक तावडेने जीवे मारले.

अभिषेक बेरोजगार असल्याची माहिती आहे. तसेच, त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याने या आई लेकामध्ये वारंवार वाद होत होते. त्यातूनच हे कृत्य करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत अपमृत्यूची नोंद केली आहे.

यामध्ये काही संशयास्पद असे काहीच आढळले नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, अभिषेक याने आईची हत्या करून आत्महत्या का केली असावी, यामागील नेमके कारण समजू शकले नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलिस करत आहेत.

मुंबईतील विक्रोळी परिसरातील कन्नमवार येथील गुलमोहर सोसायटीमध्ये अभिषेक हा आई-वडिलांसोबत वास्तव्यास होता. त्याचे वडील लोअर परळ येथे खाजगी कंपनीत कार्यरत होते. अभिषेकची आई एका दवाखान्यात काम करते.

आई आणि मुलामध्ये रोज भांडणं होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे या भांडणाला कंटाळून वडील कार्यालयातच थांबायचे. ते आठवड्यातून फक्त रविवारी घरी जात होते. नेहमीप्रमाणे वडील रविवारी घरी आले आणि त्यांनी दरवाजा ठोठावला.

मात्र, दरवाजा कुणीही उघडला नाही. त्यामुळे मुलाला आणि पत्नीला आवाज दिला. तरीही आतून कुणीच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर वडिलांनी शेजारच्यांच्या मदतीने पोलिस आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली. घटनेचं गांभीर्य पाहता पोलिस आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाजा तोडला. तेव्हा घरात उमा या बेडरुमध्ये मृतावस्थेत आढळल्या तर अभिषेक बाहेरच्या खोलीत गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : सामान्यांची एकीची वीण उसवू नये- शरद पवार

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT