tobacco 
मुंबई

सावधान ! तंबाखूच्या थुंकीतूनही कोरोनाचा प्रसार, आरोग्यतज्ज्ञांचा इशारा

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्र पाठवल्यानंतर राज्य सरकारनेही सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकण्यास मनाई केली आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या थुंकीतून कोविड-19 विषाणूचा प्रसार होऊ शकतो, असा इशारा आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे. 

कोरोनाबाधिताच्या लाळेतील विषाणू 24 तासांपेक्षा जास्त काळ अन्य व्यक्तींमध्ये संक्रमित होऊ शकतो. त्यामुळे कोरोनाचा फैलाव ध्यानात घेऊन राज्यात तंबाखूजन्य पदार्थ, पान मसाला आणि सिगारेटसारख्या घातक पदार्थांच्या सेवनावर निर्बंध आणावेत, अशी मागणीही आरोग्यतज्ज्ञांची केली आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, तंबाखूचे सेवन करू नये आणि थुंकू नये, असे आवाहन केले आहे. तंबाखूजन्य पदार्थ, पान मसाला आणि सुगंधी सुपारी चघळण्यामुळे लाळ येण्याचे प्रमाण वाढते आणि थुंकण्याची तीव्र इच्छा होते. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे कोविड -19 विषाणूच्या प्रसारात वाढ होऊ शकते, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. लॉकडाऊन करण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गृह मंत्रालयाने सर्व जिल्हा प्रशासनप्रमुख, महापालिकांना दारू, तंबाखू आणि गुटखा आदी पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यास सांगितले आहे. महत्त्वाचे म्हणजे, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे

तंबाखू सेवनात वाढ
जीएटीएस-2 (जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षण) आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील 15 वर्षांवरील 24. 4 टक्के नागरिक धूम्रपान न करता तंबाखूचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, झारखंड, पंजाब, गुजरात, तेलंगणा, मिझोरम, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहार, ओडिशा, हरियाणा , नागालँड, आसाम या राज्यांसह आणि चंदीगड या केंद्रशासित प्रदेशात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि तंबाखू सेवन करून थुंकण्यास बंदी आहे.

राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी घातल्यामुळे कोविड- 19 विषाणूच्या प्रसार रोखण्यास नक्कीच मदत होईल. कोरोनाबाधित व्यक्तीने तंबाखू खाऊन थुंकल्यावर 24 ते 72 तासांत संसर्ग होण्याची शक्यता असते. क्षयरोगासारखे संसर्गजन्य रोगही थुंकीतून पसरतात.
- डॉ. पंकज चतुर्वेदी, उपसंचालक, टाटा मेमोरियल रुग्णालय व संस्थापक, व्हीओटीव्ही  (व्हॉईस ऑफ टोबॅको व्हिक्टिम्स)

The spread of corona through tobacco saliva Health experts warn

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs BAN W Live: एक नंबर! २१ वर्षीय श्री चरणीने इतिहास रचला, ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील १६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; बांगलादेशची दैना

Mahur Crime : माहूर येथे प्रधानमंत्री आवास योजना घोटाळाप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी, अधिकार्‍यावर गुन्हे दाखल

Delhi Crime: अल्पवयीन मुलीचं खून प्रकरण! 'तो' कॅब चालक निघाला नुपंसक, अत्याचार करण्यात अपयशी ठरल्याने केली निर्घृण हत्या

New Passport Fees: परदेश प्रवासाचे स्वप्न महागणार! केंद्र सरकारने पासपोर्ट शुल्क वाढवले; किती आणि कधीपासून नवे दर लागू होणार?

IND vs IRE : वैभव सूर्यवंशीचे भारताच्या सीनियर खेळाडूंसोबत पहिले सराव सत्र कसे राहिले? मैदानावर जाताना नेमकं काय घडले? Video

SCROLL FOR NEXT