Deputy CM Sunetra Pawar

 

esakal

मुंबई

Sunetra Pawar Emotional Post : उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट , म्हणाल्या...

Sunetra Pawar Takes Charge as Deputy CM : जाणून घ्या, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजितदादांचे स्मरण करत नेमकं काय म्हटलंय?

Mayur Ratnaparkhe

Sunetra Pawar Latest Update :उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी काही दिवसआधी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आज(मंगळवार) सुनेत्रा पवार यांनी मंत्रालयात जाऊन औपचारिकरित्या उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभारही स्वीकारला.

सुनेत्रा पवार यांनी औपचारिकरित्या उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एक्सवरील एका पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सुनेत्रा पवार एक्सवरील त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘’आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. मा. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे.’’

तसेच ‘’दादांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि लोकांशी असलेले आत्मीय नाते, हेच बळ घेऊन मी पुढील वाटचाल करणार आहे. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देणे, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणे, हीच माझी प्राथमिकता असेल.’’ असंही सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय.

याचबरोबर ‘’दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन. या कठीण प्रसंगी जनतेने दिलेले प्रेम, आधार आणि विश्वास हेच माझे सामर्थ्य आहे. त्यांच्या स्मृतीपुढे आज मी एकच वचन देते की, महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेने आणि समर्पणाने कार्य करत राहीन.’’ अशा शब्दांमध्ये सुनेत्रा पवार यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT