मुंबई

कोविड मृतदेहांचा खेळ मांडला; गायकवाडांचा मृतदेह सोनावणेंकडे, सोनावणे मात्र जिवंतच..

सकाळवृत्तसेवा

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील कोविड केअर सेंटरमधून बेपत्ता भालचंद्र गायकवाड यांच्याबाबतीत धक्कादायक माहिती समोर येतेय. ७२ वर्षीय बेपत्ता भालचंद्र गायकवाड यांचं तीन दिवसांपूर्वी निधन झालं होतं. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे भालचंद्र गायकवाड यांचा मृतदेह महापालिकेने सोनावणे कुटुंबियांना सोपवला होता. काल निरंजन डावखरे यांनी गायकवाड यांचा पत्ता लागल्याची ट्विटरवरून माहिती दिली होती मात्र त्यांचा ३ दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं. बरं, ज्या सोनावणे कुटुंबाकडे गायकवाड आजोबांचा मृतदेह सोपवला होता त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती जिवंत असल्याचं उघड झालंय. मात्र तोवर भालचंद्र गायकवाड यांच्यावर अंत्यसंस्कार केले होते.   

ठाणे महापालिकेने मांडला खेळ 

भालचंद्र गायकवाड याना सुरवातीला कळवा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांची प्रकृती खालावली होती. यानंतर त्यांना ठाण्याच्या महापालिकेच्या नव्याने सुरु झालेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. गायकवाड कुटुंबियांना याबाबत तशी माहिती देण्यात आली होती. मात्र जेंव्हा गायकवाड कुटुंबीय ठाण्यातील कोविड केअर सेंटरमध्ये गेलेत तेव्हा त्यांना धक्का बसला. कारण या सेंटरमध्ये गायकवाड नामक कुणीही व्यक्ती नसल्याची बाब त्यांना समजली. त्यानंतर गायकवाड कुटुंबीयांनी भाजपच्या माध्यमातून भालचंद्र गायकवाड यांना शोधण्याचा केला.   

नुकतेच महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यातील कोविड केअर सेंटला भेट दिली होती. या भेटीदरम्यान गायकवाड कुटुंबीयांनी त्यांची व्यथा फडणवीसांकडे मांडली होती. या भेटीनंतर या घटनेला वाचा फुटली आणि शोधाशोध सुरु झाली. ठाणे मतदाता जागरण अभियानाच्यावतीने या संदर्भात ठाणे महापालिका जबाबदार असून पालिका प्रशासनाच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. 

देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर भाजप नेते  देखील हॉस्पिटलमध्ये गेलेत. त्यांनी देखील ७२ वर्षीय भालचंद्र गायकवाड यांच्या बाबत माहिती घेतली. डॉक्टरांकडून ४८ तासात गायकवाडांबाबत माहिती देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. दरम्यान गायकवाड आजोबांचा काल रात्री शोध लागला. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचं निरंजन डावखरे यांनी ट्विट करून सांगितलं. 

गायकवाड आजोबांचा मृतदेह कोपरीमध्ये राहणाऱ्या सोनावणे कुटुंबीयांचा असल्याचं समजून त्यांना देण्यात आलेला. मृतदेह काळ्या रंगाच्या बंद पिशवीत होता आणि त्यावर अंत्यसंस्कार देखील पार पडले. मात्र सोनावणे कुटुंबातील व्यक्ती जिवंत अजून ज्यांच्यावर अंत्यसंस्कार झालेत ते भालचंद्र गायकवाड होते अशी माहिती आता समोर येतेय. 

thane municipal corporations covid center handovers body of demised person to different family

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: रुपाली चाकणकर यांचा अखेर राजीनामा! राजीनाम्याचं कारणही सांगितलं

धर्मांतर कायद्यानंतर आता UCC! महाराष्ट्रात समान नागरी संहिता लागू करणार? विवाह, वारसा, घटस्फोट नियमांमध्ये होणार बदल

Ashok Kharat: ''अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर घडलेला प्रकार गंभीर...'', आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अमरावतीत स्वच्छतेचा बोजवारा; कंत्राटदार नियुक्तीच्या प्रक्रियेला खीळ; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या तलवारी म्यान

Latest Marathi News Update: राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT