Thane News sakal
मुंबई

Thane News: आनंद दिघेंच आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदेंनी हडपल, राऊतांचा थेट आरोप

आनंद दिघे यांची खरी संपत्ती असलेला आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदे यांनी हडपल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला |

सकाळ वृत्तसेवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या संपत्तीबाबत विचारले असल्याचा आरोप केला होता. त्या आरोपाला प्रत्युत्तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले. आनंद दिघे यांची खरी संपत्ती असलेला आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदे यांनी हडपल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

ठाणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारसभेत मंगळवारी (ता. ७) ते बोलत होते. नरेंद्र मोदी हे नकली फकीर असून खरे फकीर हे आनंद दिघे होते, असेही राऊत यांनी यावेळी सांगितले. आनंद दिघे यांनी गद्दारांना क्षमा नाही, असे म्हटले होते. हा विचार ४ जूननंतर ठाण्यात अमलात आणायचा असल्याचा घणाघातदेखील राऊत यांनी केला. तसेच आनंद दिघे यांच्यावर आधारित तयार केलेला खोटा चित्रपट हा त्यांचा अपमान आहे. ठाणेकर अशा व्यक्तींना माफ करणार नाहीत, असेही राऊत यांनी म्हटले.

राज्यात दोन ठिकाणी प्रचार करण्याची गरज नाही. एक ठाणे आणि दुसरे बारामती. येथे प्रचार करण्याचा प्रश्नच येत नाही. येथील घटनाबाह्य मुख्यमंत्री मोदींच्या सहवासात गेल्यापासून खोटं बोलायचे, रेटून बोलायचे, असे वागत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या मुलाला ठाण्यातच उभे करायला पाहिजे होते. ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे तिथे मशालच विजयी होणार असून चोरीचा माल पचणार नसल्याची टीकाही त्यांनी केली.

ब्रिटिशांनी लुटला नसेल एवढा देश या लोकांनी दहा वर्षांत लुटला आहे. कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराज यांचा पराभव व्हावा, म्हणून मुख्यमंत्री पैसे वाटत होते. कोल्हापूरच्या एका हॉटेलमध्ये मुख्यमंत्री शंभर कोटी घेऊन बसले होते, असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला. दरम्यान, भाजप देशात दीडशे पण जागा पार करू शकत नाही. इंडिया आघाडीच्या देशात ३२० हून अधिक जागा निवडून येण्याचा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Monsoon: पावसाचा ११९ वर्षांचा विक्रम, पुणे शहरात जुलैमध्ये ५२६ मिलिमीटर पावसाची नोंद

Ichalkaranji Municipal Commissioner : इचलकरंजीत आयुक्तांच्या बदलीवरून संघर्ष; भाजपमधील आवाडे-हाळवणकर गटात वाद पेटण्याची चिन्हे, CM फडणवीसांची मागितली वेळ

Commonwealth Games 2026: एका माजी गोलंदाजाने नीरज चोप्राला भालाफेकीत हरवले; CWG मध्ये गोल्ड जिंकणारा तो कोण?

Latest Marathi News Live Update : अमित शहा गो बॅक! काँग्रेसचं पुण्यात आंदोलन, तर भाजप कार्यकर्ते काँग्रेस भवनच्या दारात

Abhijeet Dipke on Jai Bhim : 'जय भीम' हा नारा केवळ एका समाजाचा नाही; अभिजीत दिपके यांचे वक्तव्य, 'ब्लॅक अँड व्हाईट'मध्ये अनेक खुलासे

SCROLL FOR NEXT