eknath shinde in covid ward 
मुंबई

पालकमंत्री एकनाथ शिंदे थेट कोव्हिड वॉर्डात; रुग्ण आणि डॉक्टरांची केली विचारपूस..

राजेश मोरे

ठाणे : राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी आज अचानक ठाणे कोव्हिड रुग्णालायाला भेट दिली.  शिंदे यांनी पीपीई किट घालून कोरोना बाधित रूग्णांची विचारपूस करून त्यांचे आणि तेथे काम करणाऱ्या डॉक्टरांचे व इतर कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उंचावले. 

यावेळी शिंदे यांनी रुग्णांना काळजी घ्या व लवकर बरे व्हा अशा शुभेच्छा दिल्या. दरम्यान, कोव्हिड रूग्णालयातील सर्व रूग्णांना त्यांच्या वतीने दूध, अंडी आणि फळे देण्याचा निर्णय घेतला. कल्याणची बैठक आटोपून शिंदे ठाण्याला परत निघत होते. अचानक त्यांनी गाडी कोव्हिड रूग्णालयाकडे घेण्यास सांगितले. तेथे पोहोचल्यानंतर तेथील सुविधांची पाहणी केली आणि पीपीई किट घालून डॉक्टरांसोबत चक्क कोरोना बाधित रूग्णांच्या वॉर्ड्सना भेटी दिल्या. 

शिंदे यांनी डायलेसीस, आयसीयू,ॲाक्सीजन आणि नॉन ॲाक्सीजन वार्डसना भेटी दिल्या. नुसत्याच भेटी दिल्या नाही तर रुग्णांची विचारपूस केली. 'जेवण व्यवस्थित मिळते का, औषधे दिली जातात का, काही अडचण आहे का अशी विचारपूस केली. घाबरू नका, काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा', असे म्हणत त्यांनी तेथील रूग्णांचे मनोबल वाढविले. त्याचबरोबर डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ यांच्याशीही संवाद साधून स्वत:ची काळजी घेण्याच्या सूचना केल्या. 

या भेटीत त्यांनी रूग्णांना गरम पाणी मिळते का, तसेच शौचालये आणि बाथरूम साफ आहेत का याचीही पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत उपायुक्त विश्वनाथ केळकर, संदीप माळवी आणि डॉक्टर्स उपस्थित होते.

संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC New Rule: चेंडूचा रंग बदलणार, गौतम गंभीर ड्रिंक्स ब्रेकमध्ये टीमला रणनीती सांगायला येणार; क्रिकेटमध्ये नव्या बदलाचे संकेत

Petrol-Diesel Price: GST लागू झाल्यास पेट्रोल-डिझेल किती स्वस्त होऊ शकतं? जाणून घ्या धक्कादायक गणित

Thane: ठाकरे गटाच्या बैठकीत मोठा गोंधळ! शाखेत अचानक ६० ते ७० जणांचा प्रवेश, शाखाप्रमुखांवर जोरदार हल्ला; नेमकं काय घडलं?

Shashikant Shinde Jayant Patil : जयंत पाटील आणि शशिकांत शिंदेंमध्ये दुरावा?, शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं; कोल्हापुरातून पक्षाची बांधणी करणार

"पॉकेटमनीसाठी बाप पाहिजे आदर करण्यासाठी नको" सावत्र भावाचे प्रतीक बब्बरवर आरोप; "आता त्यांना बाबा म्हणत नाही"

SCROLL FOR NEXT