मुंबई

आजपासून तुमच्या आयुष्यातील 'या' गोष्टी बदलणार..

सकाळवृत्तसेवा

आज १ फेब्रुवारी २०२० आहे. आजपासून आपल्या दैनंदिन सवयीच्या काही गोष्टी बदलणार आहेत. ज्याचा परिणाम थेट आपल्या रोजच्या आयुष्यावर पडताना पाहायला मिळेल. आज केंद्र सरकार आपलं वार्षिक बजेट देखील सादर करतंय. बजेटचा आपल्या आयुष्यावर दूरगामी परिणाम होतंच असतो. मात्र आजपासून तुमच्या आमच्या आयुष्यात काय बदलणार आहे, पाहुयात.   

सर्वात आधी माहिती तुम्हा आम्हाला वेड लावलेल्या WhatsApp बद्दल. तुम्हाला आता WhatsApp वापरायचं झाल्यास तुमचा फोन अपडेटेड असणं गरजेचं आहे. कारण आजपासून जुन्या OS म्हणजेच जुन्या व्हर्जनच्या अँड्रॉइड आणि आयफोनवर WhatsApp चालणार नाही. मिळालेल्या माहितीच्या आधारे अँड्रॉईड व्हर्जन २.३.७ आणि  आयफोनच्या आयओएस ७वर किंवा त्याखालील व्हर्जनमध्ये WhatsApp चालणार नाही. WhatsApp ने या पूर्वीच इतर काही ऑपरेटिंग सिस्टीमवर आपला सपोर्ट बंद केलाय. यामध्ये ब्लॅकबेरी आणि सिम्बियनचा समावेश आहे.     

यानंतर नंबर लागतोय बँकांचा आणि LIC चा. बँकांचा संप सुरु आहे. आज बँकांच्या संपाचा दुसरा दिवस आहे. या संपाचा परिणाम तुमच्या आमच्या दैनंदिन आयुष्यावर होताना पाहायला मिळू शकतो.  बँकांच्या दोन दिवसीय संपला जोडून रविवार आलाय. त्यामुळे या संपाचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही ATM मधून पैसे काढायला गेलात आणि पैसे आलेच नाहीत, असं होऊ शकतं.   

याससोबत भारतीय आयुर्विमा कंपनी म्हणजेच LIC ची पॉलिसी जर तुम्हाला घ्यायची असेल तर नीट चौकशी करूनच घ्या. कारण आजपासून LIC मार्फत सुरु असलेल्या तब्ब्ल २३ योजना बंद केल्या गेल्यात. यामध्ये नवीन   मार्गदर्शक तत्त्वांनुसार नसलेल्या योजना बंद होणार आहेत. त्यामुळे LIC पॉलिसी काढताना तुम्ही कुणाकडून पॉलिसी घेतायत आणि कोणती पॉलिसी घेतायत, याची जरा सविस्तर माहिती घ्या. 

१ फेब्रुवारीपासून म्हणजेच आजपासून प्रत्येक महिन्याच्या सुरवातीलाच गॅसचे नवीन दर ठरवले जाणार आहेत. आंतराराष्ट्रीय बाजारात झालेले बदल आता आपल्याला जाणवू लागणार आहेत. त्यामुळे आपल्या दैनंदिन वापरात असलेल्या LPG गॅसच्या भावांवर लक्ष असायलाच हवं. गेल्या काही महिन्यात विनाअनुदानित LPG सिलिंडरचे चढेच राहिलेत. अशात आता गॅसच्या दरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.  

तुम्ही ATM मध्ये गेलात आणि जर तुमच्याकडे चिपवालं ATM कार्ड नसेल तर तुम्हाला त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. बहुतेक सर्वांनी आपापले ATM कार्ड बदलून घेतलेच असतील मात्र तुमच्याकडे डाक विभागाचं ATM असेल आणि ते चुंबकीय पट्टीचं असेल तर मात्र तुम्हाला त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे तुम्ही तुमचं जुनं ATM तातडीने बदलून घ्या. डाक विभागाने आपल्या सर्व ग्राहकांना आपले मोबाईल नंबर अपडेट करणे आणि आपलं जुनं चुंबकीय पट्टीवालं  ATM कार्ड बदलून घेण्यासाठी ३१ जानेवारी पर्यंतची मुदत दिली होती. सुरक्षिततेसाठी सर्वच बँकांनी आता चिप असलेलं कार्ड ग्राहकांना दिली आहेत.  

these five things will change from 1st February 2020 check detail dist

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मनीष सिसोदियांना झटका! कोर्टानं दुसऱ्यांदा नाकारला नियमित जामीन

SCROLL FOR NEXT