panvel 
मुंबई

लॉकडाऊन : गावी जायच्या ओढीने ते चक्क डोंगर चढून आले पण...

सकाळवृत्तसेवा

नेरळ : लॉकडाऊनच्या काळात कामधंदा नसल्याने गावाच्या ओढीने चक्क डोंगर चढून अकोला जिल्ह्यात जाणाऱ्या पनवेल येथील मजूरांना नेरळ पोलिसांनी अडवत त्यांना जेवण देऊन पुन्हा आले त्याच रस्त्याने पनवेलच्या घरी पाठवून दिले आहे.

सध्या कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रत्येकाला आहे त्याच ठिकाणी थांबण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच शहर परिसरात मजूर आणि कामगार मोठ्या संख्येने अडकून पडले आहेत. हे मजूर कोणत्याही वाहनातून गावी जाणार नाही, याची काळजी पोलिसांकडून घेण्यात येत असली तरी पनवेल परिसरात मजूर म्हणून काम करणाऱ्या अकोला जिल्ह्यातील 30 मजूरांनी मात्र अकोला जिल्ह्यातील आपल्या घरी जाण्यासाठी नामी युक्ती शोधली. महिला आणि पुरुषांचा भरणा असलेल्या या 30 मजूरांनी गुरूवारी दुपारी पनवेल सोडले. तेथून शिरवली जंगलातून डोंगर चढून पेब किल्ल्यावर पोहचले. तेथून खाली उतरण्यासाठी प्रवास सुरू केला. डोंगर चढून आलेले मजूर हे पुन्हा डोंगर उतरून खाली उतरले आणि नेरळ येथे स्थानिक आदिवासी लोकांच्या नजरेला पडले. त्यानंतर आनंदवाडी येथील आदिवासी लोकांनी ही बाब मोहाचीवाडीतील कार्यकर्त्यांना सांगितली.

सर्व मजूर पुन्हा पनवेलमध्ये दाखल
सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील आणि महसूल मंडळ अधिकारी माणिक सानप यांनी घटनास्थळी जाऊन सर्व मजूरांना सूचना देऊन शुक्रवारी सकाळी पुन्हा आले त्या ठिकाणी परत जाण्याचे आदेश दिले. त्या सर्व 30 मजुरांची राहण्याची व्यवस्था तेथील एका इमारतीमध्ये तर रात्रीच्या जेवणाची व्यवस्था स्थानिक रहिवासी आणि ज्येष्ठ कार्यकर्ते भगवान चव्हाण यांनी केली. सर्व मजूर पुन्हा पनवेल येथे पोहोचल्याचे पोलिसांनी सांगितले.

तपासणीनंतरच सर्व मजूरांची सुटका
बाहेरील मजूर आल्याची माहिती मिळताच नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे एक पथक तात्काळ तेथे पोहचले. नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथकाने सर्व मजुरांची तपासणी करून घेतली. नेरळ पोलिसांनीही तेथे येऊन सर्व मजूरांना सायंकाळी त्याच ठिकाणी थांबवले.

 They came up the mountain The police sent them back

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT