Alibag civil hospital
Alibag civil hospital sakal media
मुंबई

अलिबाग येथील जिल्हा रुग्णालय समस्यांच्या गर्तेत; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : येथील जिल्हा रुग्णालय (Alibag civil hospital) पुन्हा समस्यांच्या गर्तेत सापडू लागले आहे. बेशिस्त वाहन पार्किंग, रस्त्यावर पसरलेले सांडपाणी आणि शवविच्छेदन खोलीकडे (Autopsy room) जाणाऱ्या मार्गात खड्डे अशा अनेक समस्या आहेत. यामुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईक व कर्मचाऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न (Health problems) गंभीर होऊ लागला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय सुमारे ३० वर्षांपूर्वीचे आहे. या ठिकाणी २५० खाटा आहेत. दिवसाला एक हजारपेक्षा अधिक रुग्ण (Patients treatment) येथे उपचारासाठी येतात. मात्र ही वास्तू पुन्हा समस्यांच्या तडाख्यात सापडली.

रुग्णालयात आवारात बेशिस्त वाहन पार्किंगचा प्रश्‍न आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना तसेच रुग्णांना घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिका व अन्य खासगी वाहनांना अडथळा निर्माण होतो. ही बाब अनेक वेळा रुग्ण प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. मात्र त्यावर ठोस उपाययोजना केली जात नाही. रुग्णालयाच्या आवारात पार्किंगसाठी पुरेशी जागा असतानाही अनेक जण मिळेल त्या ठिकाणी वाहन पार्किंग करतात.

रुग्णालयातील सांडपाण्याचे नियोजन करण्यासाठी वाहिनी आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी स्वतंत्र जागा आहे; परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे रुग्णालयातील सांडपाणी मुख्य प्रवेशद्वारातून रस्त्यावर येते. त्यामुळे समुद्रकिनारी फिरण्यास जाणाऱ्या पर्यटकांसह स्थानिकांना नाक दाबून ये-जा करावी लागते. सांडपाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शवविच्छेदन कक्षाकडे जाणाऱ्या मार्गाकडे भला मोठा खड्डा आहे. या ठिकाणी रुग्णालयातील कर्मचारी पडून त्यांना दुखापत झाली आहे. रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह रुग्णांच्या नातेवाईकांना बसतो. समस्यांमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

अलिबाग येथील जिल्हा रुग्णालय ते जिल्हा शल्यचिकित्सकांचा बंगला या ठिकाणी कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे. या रस्त्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयापासून काही अंतरावर शवविच्छेदन कक्ष आहे. या कक्षाच्या जवळ भला मोठा खड्डा असून त्यामुळे अपघात होण्याची भीती आहे. यापूर्वी मृतदेह शवविच्छेदनासाठी नेत असताना कर्मचारी खड्ड्यात पडून जखमी झाला होता.

- ॲड. आशीष रानडे, शेकाप आरोग्य सेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT