Accident Sakal
मुंबई

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दोन अपघातात एक ठार, दोन जखमी

सकाळ वृत्तसेवा

कासा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर (Mumbai-Ahmadabad Highway) कासा आणि मेंढवण येथे रविवारी (ता. ६) झालेल्या दोन अपघातात (Accident) एक जण ठार, तर दोन जखमी (one person died) झाले. गेल्या काही दिवसांत या महामार्गावर अपघातांच्या संख्येत वाढ होत असून, महामार्ग प्राधिकरणाने वेग नियंत्रणासाठी सूचना फलक व गतिरोधक बसवावेत, अशी मागणी जोर धरत आहे.

रविवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास मेंढवण येथे गुजरात वाहिनीवर चालत जाणाऱ्या दोन पादचाऱ्यांना भरधाव वाहनाने धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामस्थांनी जखमी अवस्थेत कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्रथमोपचार करून डोक्याला, पायाला व हाताला गंभीर जखम झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी शेलवास येथील विनोबा भावे रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.

दुसरा अपघात सायंकाळी ७.४५ वाजता कासा-सायवन मार्गावरील वाघाडी गावाजवळील वळणावर भरधाव कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार रस्त्याजवळील झाडावर धडकली. यात कारचालक माणिक बद्रे (३२, रा. यवतमाळ) हे गंभीर जखमी झाले. बद्रे हे सायवन येथील सरकारी आश्रम शाळेत अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना स्थानिकांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; परंतु मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बद्रे हे काही वर्षांपूर्वी सायवन येथे कार्यरत झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: कोस्टल रोडचा दहिसर-विरारपर्यंत विस्तार होणार! मुंबईसह पर्यटकांना मोठा लाभ; काय आहे नियोजन?

AUS vs IND, T20I Series: टीम इंडियाच्या मार्गातील मोठा अडथळा झाला दूर; ऑस्ट्रेलियन संघातून धोकादायक फलंदाज बाहेर

Latest Marathi News Live Update : पुणे-बेंगळुरू महामार्गावर भीषण अपघात

Shocking News : पती दारू पिऊन झोपी जायचा, दीर दूधात नशेचा पदार्थ मिसळून अत्याचार करायचा; सासरच्या छळाची पीडितेने सांगितली आपबीती

Nashik News : ८ महिन्यांपासून आमदारांचा निधी अडकला! ‘ई-समर्थ पोर्टल’च्या चाचणीमुळे विकासकामांवर 'ब्रेक', लोकप्रतिनिधींपुढे नवा पेच

SCROLL FOR NEXT