Home
Home sakal media
मुंबई

वाशी : बांधकाम साहित्याच्या किमतीत भरमसाट वाढ; घरांच्या किमती वाढणार ?

सकाळ वृत्तसेवा

वाशी : गेल्या दोन महिन्यांमध्ये बांधकाम साहित्याच्या किमतीत (construction materials) भरमसाट वाढ झाल्यामुळे कन्स्ट्रक्शन कॉस्टमध्ये (cost increases) प्रतिचौरस फुटामागे अडीचशे ते तीनशे रुपयांनी वाढ झाली आहे. परिणामी, घरांच्या किमतीही वाढणार (House price may increase) असून सामान्यांना घर घेणे अवघड होणार आहे. दोन वर्षांपासून बांधकाम साहित्याच्या किमती सातत्याने वाढतच आहेत. स्टील, सिमेंट, विटा, रेती, खडी या सर्व साहित्याच्या किमतीत २० ते २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी २८० रुपयांना असणारी सिमेंटची (cement) गोणी आता ३५० रुपयांवर गेली आहे. सिमेंट कंपन्या एकी करून ठरवून किमती वाढवत असल्याचे बांधकाम व्यावसायिकांचे मत आहे.
स्टीलचे दरही सातत्याने चढेच आहेत.

दोन वर्षांपूर्वी ४० रुपये किलोप्रमाणे असलेले स्टील दिवाळीदरम्यान ६० रुपयांवर होते. आता ते ६८ रुपयांवर पोचले आहे. वाळू, रेतीसह सर्व प्रकारच्या गौण खनिजांवरील रॉयल्टी वर्षभरापूर्वी दुप्पट करण्यात आल्यानंतर त्याच्या किमतीतही भरमसाट वाढ झाली आहे. आधी सहा हजार रुपये प्रतिब्रासप्रमाणे मिळणारी वाळू आता ७,००० ते ७,५०० रुपयांवर पोचली आहे. त्यातच रेती उपाशावर बंदी असल्यामुळे वाळूचा तुटवडा जाणवत असतो. बांधकाम साहित्याचे दर सातत्याने चढेच असल्यामुळे त्याचा परिणाम घरांच्या किमती २० ते २५ टक्क्यांनी घरे वाढण्याची शक्यता आहे.

टाइल्स, मार्बलही महागले

घरासाठी टाइल्स, दारे-खिडक्‍यांच्या चौकटींसाठी मार्बल, कडप्प्यांची आवश्यकता भासते. या दोन्हींच्या किमतीतही मोठी वाढ झाल्याचे तुर्भे येथील येथील मार्बल व्यावसायिकांनी सांगितले. दोन बाय दोन चौरस फूट आकाराच्या टाइल्सचा बॉक्स आधी चारशे रुपये होता, तो आता ४८० रुपयांवर गेला आहे. एक बाय दीड चौरस फूट टाइल्सचा बॉक्सही १९० रुपयांवरून २३० रुपयांवर पोहचला आहे. कडप्पा आधी ३६ रुपये चौरस फूट होता, तो आता ४५ रुपयांवर गेला आहे. ग्रेनाइटच्या दरांत सध्या फारशी वाढ झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.

पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आहे. परिणामी बांधकाम साहित्य महागले आहे. ग्राहकांकडून मागणी चांगली आहे. मात्र, काही साहित्य उपलब्ध होत नाही.
- राकेश म्हात्रे, विक्रेता, बांधकाम साहित्य

बांधकाम साहित्य सातत्याने महाग होत आहे. त्यामुळे बांधकाम खर्चात मोठी वाढ होत असून, अंतिमतः ग्राहकांवरच हा बोजा पडणार आहे. घरांच्या किमतीत २० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.
- विजय मिश्रा, बांधकाम व्यावसायिक

साहित्य - आधीचे दर- सध्याचे दर

सिमेंट (प्रतिबॅग) - २८० - ३५०
वाळू (प्रतिब्रास) - ६००० - ७५००
वॉश सँड (प्रतिब्रास) - ३८०० -४८००
खडी (प्रतिब्रास) - २३०० -२८००
विटा सहा इंच (प्रतिहजार) - १०,०००- १४०००
विटा चार इंच (प्रतिहजार) - ६५०० -८०००
ब्लॉक (प्रति घनमीटर) - २८००-३३००
खडी (प्रतिब्रास) - २३००-२८००
कच पावडर (प्रतिब्रास) - २३०० - २८००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : तू कोणत्या ग्रहावर बॅटिंग करतोयस? युवीचा हेडला थेट सवाल, अभिषेक शर्माबाबत केलं मोठं वक्तव्य

'4 जूनला धमाका होणार आणि मी तीन लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी होणार'; नारायण राणेंना विश्वास

Nanded News : विवाहितेच्या खूनप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा; नातेवाइकांनी मृतदेह २० तासांनंतर घेतला ताब्यात

Latest Marathi News Live Update : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या पुण्यात सभा

पुण्याच्या प्रसिद्ध सीईओपी कॉलेजमध्ये धक्कादायक प्रकार; विद्यार्थीनींचे व्हिडिओ काढून मित्राला पाठवले, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT