navi mumbai municipal corporation sakal media
मुंबई

शहरातील कोविड केअर केंद्र बंद; नवी मुंबई महापालिका आयुक्तांचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : कोविड रुग्णांची संख्या (corona patients) घटल्यामुळे शहरातील सर्व कोविड केअर केंद्रे बंद (corona care center) करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अभिजित बांगर (Abhijit bangar) यांनी घेतला आहे. बांगर यांनी अधिकाऱ्यांसोबत रुग्णांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्‍या बैठकीत कोविड केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णांच्या सेवेसाठी आणि पुन्हा कोविडने डोके वर काढल्यास अशा रुग्णांसाठी वाशीतील (cidco corona center) सिडको कोविड केअर केंद्र सुरू राहणार आहे.

कोविड प्रभावित काळात नियमितपणे जागतिक व राष्ट्रीय स्थितीचा आढावा घेत तसेच राज्यातील मुंबईसह इतर शहरांची सद्यःस्थिती विचारात घेऊन नवी मुंबईमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड सुविधांमध्ये आवश्यकतेप्रमाणे वाढ करणे याबाबत नवी मुंबई महापालिका सतर्कतेने पुढाकार घेऊन कार्यवाही केली. तिसऱ्या लाटेची सज्जता करतानाही महापालिका व खासगी अशाप्रकारे एकूण १२ हजार बेड्सची उपलब्धता करून ठेवण्यात आली. यामध्ये विशेष म्हणजे दुसऱ्या लाटेत जाणवलेली आयसीयू व व्हेंटिलेटर सुविधेची कमतरता लक्षात घेता ती दूर करण्यासाठी प्रभावी पावले उचलण्यात आली.

ही वाढ करतानाही नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आयसीयू सुविधा निर्माण करून या रुग्णालयांचा कोविड नंतरच्या काळातही पूर्ण क्षमतेने वापर होईल याकडे विशेष लक्ष देण्यात आले व महापालिकेची आरोग्य सेवा सक्षम करण्यात आली. त्यामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील कोविडचा प्रभाव रोखण्यात महापालिकेस यश लाभले. सद्यःस्थितीत कोविडचा प्रभाव झपाट्याने कमी होताना दिसत असून नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरी जीवन सुरळीत व्हावे यादृष्टीने अनेक सुविधा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्या आहेत असे समाधानकारक चित्र असले तरी कोविडचा धोका पूर्णपणे टळलेला नाही याची गांभिर्याने दखल घेऊन दैनंदिन चाचणीचे प्रमाण ५ हजारापेक्षा कमी होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी आरोग्य विभागास दिले.

या सुविधा बंद होणार

कोविड काळात निर्माण करण्यात आलेल्या उपचार सुविधांची कोविड सेंटर ही महापालिकेची समाज मंदिरे, सांस्कृतिक भवने अशा वास्तूंमध्ये निर्माण करण्यात आली होती. सदर वास्तू मध्ये नागरिकांना पुर्ववत कार्यक्रम करता यावेत यादृष्टीने तेथील आरोग्य उपकरणे व सुविधा काढून घ्याव्यात असेही निर्देशित करण्यात आले. कोविड बाधितांच्या आरोग्य स्थितीची दैनंदिन विचारपूस करून त्यांना दिलासा देणारे कॉल सेंटर तसेच विशेषत्वाने दुसऱ्या लाटेत नागरिकांच्या बेड उपलब्धतेसाठी व त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध होण्याकरिता युद्ध पातळीवर मदतकार्य करणारी वॉर रूम कोरोना बाधितांचे संख्या लक्षणीयरित्या कमी झाल्याने बंद करावी व त्यांच्यामार्फत केले जाणारे कोरोना रुग्णसंपर्काचे काम संबंधित नागरी आरोग्य केंद्रामार्फत करण्यात यावे असे अभिजित बांगर यांनी निर्देश दिले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तसेच इतरही विभागांनी कोविड प्रभावीत काळात नागरिकांना दिलासा व समाधान देणारे काम केले. तथापि कोविड अजून पूर्णत: संपलेला नाही याची दखल घेऊन जोपर्यंत शासन निर्देश येत नाहीत तोपर्यंत कोविडच्या विषाणूपासून दूर राहण्यासाठी मास्कचा वापर नियमित करणे अनिवार्य आहे तसेच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणेही स्वत: च्या व इतरांच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे.
अभिजित बांगर, आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Cheating Case : मुंबईमध्ये पोलिस अधिकारी आहे, ‘महसूल’ खात्यातील नोकरी देतो; कोल्हापुरातील एकाची आयुष्याची कमाई लुटली अन्...

Vijay Hazare Trophy Schedule: रोहित शर्मा, विराट कोहली यांना Live खेळताना कुठे पाहता येणार? समोर आलं वेळापत्रक

RTE Admission 2026: खाजगी शाळांमध्ये मोफत शिक्षणासाठी लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होणार; मुलांचे वय किती असावे? वाचा सविस्तर माहिती

Accident News : एक ट्रक उलटला, पाठीमागून ४ ट्रक, एक बस आणि कारने धडक दिली; दोघांचा मृत्यू, १६ जण जखमी

Thackeray Brothers Alliance : जागावाटप पूर्ण, कोणत्याही क्षणी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा; राजकीय घडामोडींना वेग, महत्त्वाची अपडेट समोर...

SCROLL FOR NEXT