mumbai Crime News esakal
मुंबई

Crime News: ड्रग्जच्या आहारी गेलेल्या मुलाची आईकडून चाकू भोसकून हत्या

जोगेश्‍वरीतील शुक्ला कंपाउंडमध्ये तिच्या दोन मुलांसह राहते. तिचा पती शितलाप्रसाद हे उत्तरप्रदेशात वास्तवास आहे |Shukla lives in a compound in Jogeshwari with her two children. Her husband Shitlaprasad is based in Uttar Pradesh

CD

Andheri Crime: ड्रग्जच्या आहारी गेलेल्या मुलाची आईने चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना जोगेश्‍वरी परिसरात उघडकीस आली आहे. शिवकुमार शितलाप्रसाद दुबे असे मृत मुलाचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी बिंदू शितलाप्रसाद दुबे हिला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. (Jogeshvari Crime)

आरोपी आईला रविवारी (ता.१४) वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर केले जाणार आहे. बिंदू ही मूळची उत्तरप्रदेशची रहिवासी असून ती जोगेश्‍वरीतील शुक्ला कंपाउंडमध्ये तिच्या दोन मुलांसह राहते. तिचा पती शितलाप्रसाद हे उत्तरप्रदेशात वास्तवास आहे.

दरम्यान शिवकुमार हा काहीच कामधंदा करत नसून त्याला ड्रग्ज सेवन करण्याचे व्यसन लागले होते. त्यातून बिंदू हिचे त्याच्यासोबत खटके उडत होते. शनिवारी सायंकाळी शिवकुमार हा नेहमीप्रमाणे ड्रग्जच्या नशेत घरी आला होता. यावेळी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते.

या वादातून रागाच्या भरात त्याने बिंदूला हँगरने मारहाण केली त्यातच बिंदूनेही चाकूने त्याच्यावर छातीवर वार केले होते. यामध्ये शिवकुमार हा गंभीररीत्या जखमी झाला.

घटनेच्या माहितीनंतर ओशिवरा पोलिसांनी घटनास्थळी धाव जखमी शिवकुमारला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.( Drug addicted child stabbed to death by mother)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर,काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT