मुंबई

Bhiwandi Loksabha: भिवंडी लोकसभा लढणार एमआयएमचा उमेदवार!

आमचा पक्ष याठिकाणी उमेदवार देणार आहे. या कार्यक्रमासाठी शहरातील मान्यवर व पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.

CD

Bhiwandi News: भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव एमआयएम पक्ष लोकसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती एमआयएम पक्षाचे प्रवक्ते तथा माजी आमदार वारीस पठाण यांनी दिली.

शहरातील खंडूपाडा भागात रमजान ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन एमआयएमचे शहर सचिव शादाब उस्मानी यांनी केले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी सांगितले की, निवडणुकीत उमेदवार उभा करण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे आमचा पक्ष याठिकाणी उमेदवार देणार आहे. या कार्यक्रमासाठी शहरातील मान्यवर व पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.

एमआयएमचे शहर सचिव शादाब उस्मानी यांनी यावेळी सांगितले की, या लोकसभा निवडणुकीतून भविष्यातील निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यासाठी आमचा पक्ष तयारी करणार आहे.

दरम्‍यान, भिवंडी हे मुस्लिमबहुल शहर असून येथे काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, एमआयएम आदी पक्षांचे मतदार मोठ्या संख्येने असल्याने विविध निवडणुकांमध्ये या मतदारांच्या मतदानाने उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT