मुंबई

Eknath Shinde: काँग्रेसला राहुल गांधींना लॉन्च करता आले नाही; मुख्यमंत्र्यांनी लगावला टोला

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी या राज्याला पुढे नेण्याचे काम केले. आज हे डबल इंजिन सरकार म्हणून आपण काम करतोय |Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar worked to take this state forward. Today we are working as a double engine government

सकाळ वृत्तसेवा

Thane News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली इस्रोने चंद्रयान लॉन्च केले, पण ५० वर्षात काँग्रेसला राहुल गांधी यांचे लॉन्चिंग करता आले नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात शिवसेना ठाणे महिला आघाडी आयोजित सखी महोत्सवात केली.(eknath shinde on rahul gandhi)


हायलँड पार्क येथे आयोजित केलेल्या सखी महोत्सवात प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाषण करताना, त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. शिंदे यांनी आज बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण पुढे चाललोय. (anad dighe ekanth shinde)

बाळासाहेबांच्या विचारांचा सरकार आपण स्थापन केले आहे. खरं म्हणजे २०१९ला बाळासाहेबांच्या विचारांचा आणि या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातले सरकार स्थापन व्हायला पाहिजे होते. परंतु काहीनी स्वतःच्या स्वार्थासाठी, खुर्चीच्या मोहासाठी बाळासाहेबांचे विचार सोडले. तसेच धनुष्यबाण सोडला.

त्या काँग्रेसला खांद्यावर डोक्यावर घेतले अशी टीका नाव न घेता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. याशिवाय बाळासाहेबांनी सांगितले होते, माझी शिवसेना काँग्रेस होऊ देणार नाही. याचा विसर तुम्हाला पडला आणि तुम्ही अभद्र युती केली. मात्र आम्ही ती दुरुस्त केली.

अहंकारामुळे या राज्याला खड्ड्यात घालण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. पण, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी या राज्याला पुढे नेण्याचे काम केले. आज हे डबल इंजिन सरकार म्हणून आपण काम करतोय.

मोदी या देशाला पुढे घेऊन चालले आहे. त्यांनी दहा वर्षात एकही सुट्टी घेतली नाही. या सरकारने महिलांना या शक्तिशाली बनवण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही लोक महिलांची टिंगल करतात. काल-परवा अमरावतीला महिलांना अपशब्द वापरण्याचे काम केले. महिलांचा अपमान ज्यांनी केलाय त्यांना या निवडणुकीमध्ये ही महिला शक्ती घरी बसवल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आहे काय? तुम्ही आमच्या पैशावर जगताय; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं 'शाळा बंद' आंदोलन

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Mahadev Munde Case: परळी येथील महादेव मुंडे खूनप्रकरणी विजयसिंह बांगरचा जबाब नोंदविला

SCROLL FOR NEXT