medicine 
मुंबई

कोरोनावरील उपचारात आशेचा नवा किरण; 'या' दोन औषधांचा परिणाम येतोय चांगला...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : सध्या कोरोना संसर्ग वाढल्याने जग भयभीत झाले आहे. कोरोना संसर्ग विरोधात सर्वांनाच औषध हवे आहे. लॉकडाऊन पाळून किती दिवस संसर्ग टाळणार? असा सवाल असताना त्याशिवाय सध्या दुसरा कोणताही पर्याय दिसून येत नाही. कोरोनाला रोखण्यासाठी नवनवीन औषधांचे संशोधन होत आहेत. यात आता रेमेडिसवीर औषधाचे नाव समोर आलं आहे. भारताबाहेरील देशांतून या गोळ्यांचा प्रयोग सुरु झाला आहे. औषध नियंत्रण प्राधिकरणाकडून या औषधांना नुकतीच परवानगी देण्यात आली. सध्या क्लिनिकल ट्रायल सुरु आहे. 

कोरोनावरील उपचारासाठी रेमेडेसिवीर औषधाची मागणी सतत वाढत आहे. त्यामुळे ड्रग्ज ऑथॉरिटी ऑफ इंडियाने या औषधाला परवानगी दिली आहे. तसेच यासोबत इटोझुलोमप या औषधाचेही परिणाम चांगले असल्याने या औषधाला ही परवानगी देण्यात आली आहे. या औषधांची क्लिनिकल ट्रायल सुरु झाली असून कोरोनावर हे प्रभावी औषध ठरणार असल्याचे तज्ज्ञ सांगतात. दरम्यान, या औषधाचा परिणाम चांगला दिसून येत असल्याचे कोरोना मृत्यू विश्लेषण समिती प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. 

रेमेडेसिवीर औषधाचे उत्पादन हेटेरो आणि सिप्ला या दोन कंपन्या करणार आहेत . महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचा संसर्ग असल्याने सर्वात आधी महाराष्ट्रालाच या औषधाची गरज आहे. त्याप्रमाणे बांगलादेशातून या औषधांची आयात करण्यात येणार होती. मात्र, सध्या ते रद्द करून आता देशातच औषधांचे उत्पादन होणार आहे . यासोबत इटोझुलोमप औषधे ही परिणामकारक ठरणार असल्याचे सांगण्यात आले.  दरम्यान, लवकरच रेमेडेसिवीरची क्लिनिकल ट्रायल सुरु होणार असल्याची माहिती राज्य समन्वय अधिकारी डॉ. आकाश खोब्रागडे यांनी सांगितले.

रुग्णवाहिकेशी केला संपर्क, मागितले अवाच्या सव्वा पैसे, शेवटी ओढवली 'ही' वेळ; मुख्यमंत्रीसाहेब पाहताय ना ?

ही औषधे अँटी-व्हायरल असून काही ठिकाणी वापरण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा प्रभाव सकारात्मक येत आहे.  
- डॉ. अविनाश सुपे, प्रमुख, कोरोना मृत्यू विश्लेषण समिती 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT