मुंबई

मोठी बातमी : महाविकास आघाडीतील 'दोन' मंत्र्यांचा घेतला राजीनामा ?

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई -  नाराज नेत्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासकीय अध्यादेश काढून अरविंद सावंत आणि रवींद्र वायकरांची राज्यमंत्रिपदी नियुक्ती केली होती. अशातच आता एक महत्त्वाची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर येतेय. महाविकास आघाडीच्या दोन मंत्र्यांचे बॅकडेटेड राजीनामे ठाकरे सरकाने घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर येतेय.

रवींद्र वायकर यांची 11 फेब्रुवारीला मुख्यमंत्री सचिवालयात प्रमुख समन्वयक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर 14 फेब्रुवारीला अरविंद सावंत यांची महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपकडून आक्षेप घेतला जाण्याची कुणकुण लागताच उद्धव ठाकरे यांनी सावध पवित्र घेत दोन्ही मंत्र्यांकडून बॅकडेटेड राजीनामा घेतल्याचं सूत्रांकडून समोर येतंय. या दोन्ही मंत्र्यांनी अद्यापही आपल्या कामाचा पदभार स्वीकारलेला नाही.  

‘ऑफिस ऑफ प्रॉफिटनुसार’ भाजपकडून आक्षेप घेण्यात येईल अशी कुणकुण लागल्याने दोघांचा राजीनामा घेण्यात आलाय, अशी माहिती समोर येतेय. दरम्यान अरविंद सावंत आणि रवींद्र वायकर यांच्याकडून सदर राजीनाम्याच्या बातम्या खऱ्या नसल्याचं सांगण्यात आलं आहे.  

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. अशात मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप यासाठी लागलेला वेळ आपण सर्वानीच पहिला. महाविकास आघाडीच्या  प्रत्येक पक्षात मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी देखील होती. अशात काही वेगळी मंत्रालयं स्थापन केली जाऊ शकतात अशी चर्चा होती.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सचिवालयात प्रमुख समन्वयक आणि महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समिती ही राज्यमंत्रिपदाच्या दर्जाची पदं निर्माण करण्यात आली. तास शासकीय अध्यादेश काढण्यात आला.  मात्र आता या पदांवरून गोंधळ होऊ नये म्हणून दोन्ही मंत्र्यांकडून बॅकडेटेड राजीनामा घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. याचसोबत सुधारित अध्याश काढून या दोघांना संबंधित पदांवर कायम ठेवता येईल का? याबाबतची चाचपणी सुरु आहे.

two ministers of mahavikas aaghadi are asked to resigned says sources

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

SCROLL FOR NEXT