मुंबई

दुसऱ्या दिवशीही चाकरमान्यांची रेल्वेकडे पाठ; विशेष रेल्वेचे अवघे चार टक्के आरक्षण

प्रशांत कांबळे

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी उशिरा का होईना गणपती विशेष रेल्वे सेवा सुरु करण्यात आली. कोरोना संसर्गाची भीती आणि कोकणात गेल्यानंतर क्वारंटाईन होण्यासाठी असलेल्या कठोर नियमांमुळे अनेक चाकरमान्यांनी यंदाचा गणेशोत्सव मुंबईतच साजरा करण्याचे ठरल्याचे चित्र आहे. 

रेल्वे मंत्रालयाने गणपती स्पेशल ट्रेन सुरू करण्याला मान्यता दिल्यानंतर 14 ऑगस्टला राज्य सरकारने सुद्धा त्याला हिरवा कंदील दाखवला होता. दरम्यान पहिल्या दिवशी अत्यंक कमी प्रवाशांनी रेल्वेचे आरक्षण केल्यानंतर रविवारी सुद्धा केवळ चार टक्केच प्रवाशांनी कोकणात जाण्याचे आरक्षण केल्याचे दिसून आल्याने रेल्वेच्या स्पेशल रेल्वेला चाकरमान्यांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेची सेवा बंद ठेवण्यात आली आहे. मात्र कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. अनेक प्रवाशांनी आधीच एसटी आणि खासगी वाहनांनी  कोकण गाठल्याने रेल्वे गाड्यांकडे सुद्धा चाकरमान्यांनी पाठ फिरवल्याचे पहिल्याच दिवशी दिसून आले. दरवर्षी प्रमाणे रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांची कुठेही गर्दी दिसून आली नसून उपलब्ध आरक्षित तिकीटांपैकी अत्यंत कमी तिकीटांचे आरक्षण करण्यात आले होते. 

त्यानंतर रविवारी सांयकाळी 5 वाजेपर्यंत चार गाड्यांमध्ये एकूण 6392 आसने उपलब्ध असतांना फक्त 255 प्रवाशांनी बुकिंग केली होती. त्यामुळे शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांमध्ये घट दिसून आली आहे. दरवर्षीच्या तुलनेत रेल्वेचे गणपती विशेष रेल्वे सेवेच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे.
---- 
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVMवर भाजपच्या पर्यायावर टेप लावल्याची तक्रार; निवडणूक आयोग म्हणाले, खरं असेल तर पुन्हा मतदान घेऊ

Ambabai Temple Kolhapur : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात ओवरीतून उलगडला पुरातन ठेवा; महादेव पिंड, नंदीसह देव-देवतांच्या मूर्तींचे झाले दर्शन

Personal Loan vs Credit Card EMI: क्रेडिट कार्डचं बिल वाढलंय? EMI की पर्सनल लोन! कोणता पर्याय वाचवेल हजारो रुपये?

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये बॉम्ब सापडल्याने खळबळ; NIA कडे तपास

राज्यात हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना, ३०० कोटी वृष लागवड करणार; मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT