मुंबई

पांढऱ्या कफन ऐवजी त्यांच्या नशिबी प्लॅस्टिकच... 'ते' भोगतायत मरणानंतरच्या मरणयातना; सायन रुग्णालय मधील विदारक वास्तव समोर....

सकाळ वृत्तसेवा


मुंबई : कोरोना वॉर्ड मध्ये प्लास्टिक आवरणात लपेटलेल्या मृतदेहांचा खच पडल्याचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सायन रुग्णालयातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे कोरोना वॉर्ड मधील विदारक परिस्थिती समोर आली असून पालिका प्रशासनाच्या पोकळ दाव्यांंची पोलखोल केली आहे.

सायन रुग्णालयात कोविड वॉर्ड क्र. 3 मध्ये चार ते पाच कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचे मृतदेह पडून असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मधील वास्तव धक्कादायक असून त्यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. कोरोना वॉर्ड मध्ये प्लास्टिक च्या आवरणामध्ये हे मृतदेह लपेटून ठेवलेले आहेत. या मृतदेहाशेजारील खाटांवर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यांचे नातेवाईक, डॉक्टर, नर्स फिरत असल्याचे त्यात दिसते. तासोनतास हे मृतदेह वॉर्ड मध्ये पडले असून त्यांच्या आसपास असणाऱ्या इतर रुग्ण तसेच नातेवाईकांना संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत आहे.

सध्या मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात डॉक्टर नर्स आणि अन्य आरोग्यसेवकांना कोरोनाची बाधा होत आहे. कमी कर्मचारी असल्यामुळे हे मृतदेह पडून राहिले होते का असा सवाल विचारण्यात येत आहे. यापूर्वी केईएम, कूपर सारख्या रुग्णालयात असेच कोरोना बाधित रुग्णांचे मृतदेह पडून असल्याच्या घटना ताज्या असतानाच व्हीडोओ मधूम सायन रुग्णालयात मृतदेह पडून असल्याचा प्रकार समोर आल्याने पालिका रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर पुढील प्रक्रियेत दुर्लक्ष केलं जात असल्याचे वारंवार समोर येत आहे.

या प्रकाराबाबत  रुग्णालय प्रशासनाला विचारले असता, हा व्हिडीओ चार ते पाच दिवसापूर्वीचा असल्याचे सांगण्यात आले. तसेच सध्या  कोरोना वॉर्ड मध्ये एकही मृतदेह पडून नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांना वारंवार संपर्क साधून ते मृतदेह नेण्यास येत नाहीत. तसेच अनेकदा पोलिसांच्या प्रक्रियेत विलंब होतो. त्यामुळे मृतदेह वॉर्ड मध्ये ठेवावे लागतात. शवागृहात कोरोनामुळे मृत्यू झालेले केवळ 15 मृतदेह ठेवता येतात. तसेच ते मृतदेह शवागृहात नेल्यानंतर ही नातेवाईक येतील याची खात्री नसते.  

मात्र सध्या रुग्णालयातील सर्व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून रुग्णालयात एकही कोविड पॉझिटिव्ह मृतदेह नसल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fake FASTag Annual Pass : सावधान! बनावट ‘फास्टॅग वार्षिक पास’ने सुरू आहे फसवणूक; ‘NHAI’ने दिला इशारा

कधी सुरू झाली कधी संपली कळलंच नाही! ३ महिन्यात स्टार प्रवाहची मालिका ऑफ एअर; 'या' दिवशी असणार शेवटचा भाग

VIRAL VIDEO: “गलत करते हो यार…” रोहित शर्मा संतापला; चिमुकलीच्या सुरक्षिततेसाठी पुढे सरसावला, मुंबई विमानतळावर काय घडलं?

राम कपूर अन् साक्षी तंवर यांचा 'तो' बोल्ड सीन; पत्नी गौतमीला कानोकान नव्हती खबर, रात्री समजलं तेव्हा...

Latest Marathi News Live Update: मनसे बंडखोर उमेदवार अनिशा यांनी अडवला राज ठाकरे यांचा ताफा

SCROLL FOR NEXT