नागोठणे : वाकण येथील धोकादायक वळण. 
मुंबई

‘या’ मार्गावर प्रवाशांचा जीव धोक्‍यात

सकाळ वृत्तसेवा

नागोठणे : पाली - नागोठणे मार्गावरील महत्त्वाच्या वाकण नाक्‍याच्या थोडे पुढे केवळ १०० ते १५० मीटर अंतरावर असलेल्या तीव्र वळणावर आज झालेल्या अपघातानंतर हे ठिकाण पुन्हा चर्चेत आले आहे. या ठिकाणी पूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे हे धोकादायक वळण हटवण्याची मागणी होत आहे. 

मुंबई-गोवा महामार्गावरून मुंबई, गोवा, रोहा, खोपोली पुण्याकडे जाण्यासाठी वाकण नाका महत्त्वाचा ठरतो. काही वर्षांत तर या नाक्‍यावरून खोपोली, पुणे, महाड, धाटाव, विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रात या बाजूंकडे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

नागमोडी व अरूंद धोकादायक वळणे या रस्त्यावर असूनही एमएसआरडीसीने या मार्गाकडे म्हणावे तसे लक्ष दिले नाही. वाकण ते पाली या आठ किलोमीटरच्या अंतरातील रस्त्याची तर पावसाळ्यात दरवर्षी भयानक दुर्दशा झाल्‍याचे समोर आले आहे. मात्र केवळ थातुर मातुर खड्डे भरण्यापलिकडे एमएसआरडीसी या रस्त्याच्या बाबतीत उदासीन आहे. याचाच परिणाम म्हणून या वाकण - पाली रस्त्यावरील वळणावर अनेक अपघात झालेले आहेत. 

वळणाच्या एका बाजूला डोंगर, तर दुसऱ्या बाजूला अंबा नदीचे पात्र आहे. या रस्त्यावर असलेल्या अनेक धोकादायक वळणांपैकीच वाकण नाक्‍याजवळ असलेल्या या वळणावरही अनेक लहान-मोठे अपघात यापूर्वीही झाले आहेत. या अपघातांस अवजड वाहनेच कारणीभूत ठरल्याचे तपासात पुढे आले आहे. असे असूनही या वळणाच्या ठिकाणी रस्त्याचे आवश्‍यक ते रुंदीकरण करण्यात आलेले नाही, ही शोकांतिका आहे. भविष्यात डोंगराळ बाजूकडे खोदकाम करून या ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण करून येथील अपघातांची मालिका खंडित करण्याचे काम एमएसआरडीसीने करणे गरजेचे आहे. 

वाकण-पाली मार्गाच्या कामातील वळणांच्या रुंदीकरणात वनखात्याचा अडथळा येत आहे. याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला. याविषयी सर्व प्रक्रिया पूर्ण करून वळणांवर आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. 
- सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी

वाकण-पाली मार्गाचे चौपदरीकरण करणार आहे. मात्र, त्या आधी या मार्गातील धोकादायक वळणे हटवून रुंदीकरण करणे आवश्‍यक आहे. 
- किशोर म्हात्रे, माजी उपाध्यक्ष, भाजप, रायगड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT