मुंबई

पानसे 'मनसे' सोडणार? खोपकरांनी दिली 'खरी बातमी'; म्हणाले, 'उदय सामंतच...'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: रुपाली ठोंबरे-पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकल्यानंतर आता अभिजित पानसे (Abhijit Panse) देखील पक्ष सोडून शिवसेनेच्या वाटेवर आहेत की काय? अशी चर्चा सुरु झाली होती. विशेष करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील (MNS) काही कार्यकर्ते, जुने नेते तो पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर अशी चर्चा करणाऱ्यांना एक खोचक टोला महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी लगावला आहे. एक उपरोधिक ट्विट करत त्यांनी या प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं आहे.

अमेय खोपकर यांनी ट्विट करत म्हटलंय की, गौप्यस्फोट!!! अभिजीत पानसे यांनी उदय सामंत यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण वगैरे आलंय. पानसे पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार अशी कुजबूज सुरु झालीये. पण खरी बातमी तर अशी आहे की उदय सामंत मनसेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. म्हणून तर ते पानसेंना गुप्तपणे भेटले.

पुढे त्यांनी या ट्विटमध्येच कंसात लिहलंय की, फोकनाड सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुड्या सोडायला फार डोकं लागत नाही हेच खरं, असंही त्यांनी म्हटलंय.

अभिजित पानसे आपल्या वेगळ्या धाटणीच्या दिग्दर्शनासाठी ओळखले जातात. ते मनसेमध्ये काही वर्षांपासून कार्यरत आहे. त्यांचा एक सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday samant) यांची भेट घेतल्याचे दिसत आहे. याप्रसंगी युवासेना सचिव वरूण सरदेसाई देखील उपस्थित होते. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. या बैठकीनंतर, रुपाली पाटील ठोंबरे (rupali patil thombare) यांच्या पाठोपाठ अभिजीत पानसे ही मनसेला जय महाराष्ट्र (Jay maharashtra) करणार का..? हा सवाल सोशल मीडियातून उपस्थित केला जात होता.

गेल्या काही दिवसांपासून मनसे पक्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी दिसून आल्या आहेत. पक्षातील काही व्यक्तींनी पक्षांतर करुन दुसऱ्या पक्षाची वाट धरली आहे.त्यामुळे सोशल मीडियातून चाहते, कार्यकर्ते यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. आगामी काळात पानसे काय निर्णय घेतात याकडे त्यांचे चाहते आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेलं होतं. मात्र, अमेय खोपकरांच्या खोचक ट्विटमुळे या चर्चांना आत पूर्णविराम मिळाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : ‘पीओके’ भारताचेच, आम्ही ते घेऊ ;अमित शहा

आजचे राशिभविष्य - 17 मे 2024

Latest Marathi News Live Update : महायुतीची शिवाजी पार्कवर तर, इंडिया आघाडीची बीकेसी मैदानावर आज सांगता सभा

पुण्याचा चालता-बोलता इतिहास

Loksabha Election : पहिल्या चार टप्प्यांत ६६.९५ टक्के मतदान ; अधिकाधिक मतदानाचे आयोगाचे आवाहन

SCROLL FOR NEXT