ठाण्यातील तरुणांनी बनवलाय रिस्ट बँड सॅनिटायझर! पोलिसांकडून अनोख्या कल्पनेचे कौतुक.... 
मुंबई

ठाण्यातील तरुणांनी बनवलाय रिस्ट बँड सॅनिटायझर! पोलिसांकडून अनोख्या कल्पनेचे कौतुक...

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : लॉकडाऊनने रोजगार हिरावला असताना डगमगून न जाता ठाण्यातील दोघे होतकरू तरुण नवउद्योजक बनले आहेत. मॅकेनिकल इंजिनीअर असलेला धनंजय गरुड आणि टीएमटी सेवेतील कंत्राटी वाहकाची नोकरी गमावलेला निलेश कदम या द्वयीने गरुडझेप घेत हातात बांधण्याच्या बँडच्या माध्यमातून रिस्ट बँड सॅनिटायझरचा नवीन प्रकार उपलब्ध केला आहे. सॅनिटायजरची बाटली सोबत बाळगण्यापेक्षा या सॅनिटायझर बँडचा वापर करणे सहज सोपं आहे. पहिल्या टप्प्यात हे सॅनिटायझर बँड त्यांनी ठाण्यातील पोलिस बांधवांना मोफत वाटप केले असून पोलिसांनी देखील या अनोख्या बँडचे कौतुक केले आहे.

ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून सरकार, प्रशासन तसेच आरोग्य विभागाकडून स्वतःची काळजी घ्या, हात स्वच्छ धुवा, अशा सूचना वारंवार दिल्या जात आहेत. या जीवघेण्या विषाणूपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर बेसुमार वाढला आहे. लॉकडाऊनमध्ये धनंजय गरुड याचा व्यवसाय ठप्प झाल्याने त्याने बेरोजगार असलेल्या निलेश व काही सहकाऱ्यांच्या मदतीने कल्पक अशा हातात बांधण्याच्या रिस्ट बँडच्या स्वरूपातील सॅनिटायजरची निर्मिती करून नव्या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. हे बॅड तुम्ही सहजपणे काढू व घालू शकता. 

बँडमध्ये बसवलेल्या छोट्या ट्युबवर दाब देऊन आवश्यक तेवढे सॅनिटायझर काढून हात निर्जुंतक करता येतात, असा दावा या तरुणांनी केला आहे. विशेष म्हणजे, या उत्पादनातील घटकांचे तापमान 70°C  ते 250°C इतके असल्याने हे बँड अग्निरोधक आहेत. शिवाय, 20 मिली क्षमतेचा हा बँड लहानथोरांना पुन्हा पुन्हा भरून वापरता येणार असून, अठरा महिन्यांपर्यंत या बँडचा वापर करू शकतो, असंही हे तरुण सांगतात.

आरोग्य उत्सवाची नांदी...
सध्या येऊ घातलेल्या रक्षाबंधन किंवा फ्रेंडशीप डे च्या माध्यमातून आपण एकमेकांना भेट म्हणून हातात बांधण्यासाठी साधा बँड देण्याऐवजी हा अनोखा सॅनिटायजर बँड भेट देऊ शकते. याद्वारे आपण एकप्रकारे आरोग्य उत्सव साजरे करू शकतो, अशी संकल्पना या ठाणेकर तरुणांनी मांडली असून, सध्या या सॅनिटायझर बँडचा चांगलाच बोलबाला दिसत आहे.

सद्यस्थितीत बाजारात विविध प्रकारचे सॅनिटायझर उपलब्ध असल्याने प्रत्येकजण छोटी मोठी का होईना सॅनिटायझरची बाटली बाळगतोच. पण, बाटलीमुळे स्पर्श वाढून विषाणूचा प्रादुर्भाव वाढू शकतो. तेव्हा, आरोग्य सुरक्षेची निकड ओळखून अशा प्रकारचे सॅनिटायझर रिस्ट बँड बनवले. 
-धनंजय गरूड, नवउद्योजक, ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: ''अशोक खरातच्या माध्यमातून अजित पवारांच्या घराबाहेर काळी जादू..'', कुणाचा हात? रोहित पवारांनी सांगितला घटनाक्रम

Monalisa Viral Girl Case : 'व्हायरल गर्ल' मोनालिसाचा चित्रपट दिग्दर्शकावर गंभीर आरोप; म्हणाली, 'सेटवर अनेक वेळा माझ्यासोबत...', मनोरंजन विश्वात उडाली खळबळ

Petrol Diesel Stock Update : पेट्रोल डिझेल टंचाईवर अखेर पेट्रोलियम कंपन्यांनी केला खुलासा; साठ्याचेही सांगितलं गणित

Ashok Kharat Case Update : अशोक खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली, गोपीचंद पडळकर यांचा धक्कादायक दावा

मुलगी झाली हो...! कमळी मालिकेतील अभिनेत्री झाली आई, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT