file photo 
नांदेड

कोरोना अपडेट : नांदेडमध्ये आज तीन पॉझिटिव्ह, संख्या गेली ११९ वर

शिवचरण वावळे

नांदेड : जिल्ह्यातील १३४ संशयित व्यक्‍तींचे स्वॅब शुक्रवारी( ता. २२ मे) तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ४३ नमुन्यांची तपासणी सुरु होती. त्यात शनिवारी (ता.२३ मे) तीन रुग्ण हे कोरोना बाधित सापडल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.  

जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचे दुसरे अहवाल निगेटिव्ह येत असल्याने या रूग्णांना हळूहळू घरी सोडण्यात येत आहे. शुक्रवारी ( ता.२२ मे ) ११ पॉझिटिव रुग्णांना घरी सोडण्यात आले असतानाच दुसरीकडे चोरपावलाने पॉझिटिव रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. शनिवारी सकाळी प्राप्त नमुन्यांच्या अहवालांपैकी तीन नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे तीन्ही रुग्ण कुंभार टेकडी भागातील असुन, यामध्ये दोन पुरुष व एकामहिलेचा समावेश आहे. त्यांच्यावर एन.आय.आर. यात्रीनिवास येथे उपचार सुरु आहेत. 

जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हची संख्या आता ११९ इतकी झाली आहे. तर ५२ रुग्णांची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर उर्वरित ५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत उपचारांना प्रतिसाद न दिल्याने सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने शुक्रवार (ता.२२) पर्यंत जिल्ह्यातील एक लाख २९ हजार ४७४ व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तर २९६१ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी २५५१ तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. गुरुवारी १३४ अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. 

आजची परिस्थिती
- आज ८८ अहवाल प्राप्त
- पैकी ८५ अहवाल निगेटिव्ह
- आतापर्यंत बाधित झाले ११९
- ५२ रुग्णांना सुटी, ५९ रुग्णांवर उपचार सुरू
- सहा जणांचा मृत्यू, तर दोन फरार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modem Balakrishna : कोण होता मॉडेम बालकृष्ण? तब्बल एक कोटींचा होता इनाम, खात्मा झाल्याने नक्षलवाद्यांना मोठा झटका

Pune News : तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला मरेपर्यंत जन्मठेप

Nepal Protests : नेपाळमधील आंदोलनानंतर विमानसेवा सुरू, पर्यटकांचा मायदेशी परतीचा प्रवास

Solapur heavy rain: सोलापुरातील पावसामुळे देगाव ओढ्याला पूर; शेतीचं मोठं नुकसान, पाच तासांत होत्याचं नव्हतं झालं

Balwan Punia: ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीगीर बजरंग पुनियाच्या यशामागचा आधारस्तंभ हरपला! वडील बलवान पुनिया यांचे निधन

SCROLL FOR NEXT