file Photo
file Photo 
नांदेड

नांदेड - बुधवारी ३७ रुग्ण कोरोनामुक्त; ३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह 

शिवचरण वावळे

नांदेड - मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ज्या प्रमाणात वाढत आहे त्याच प्रमाणात कोरोनावर उपचार घेऊन रुग्ण घरी परतत आहेत. बुधवारी (ता.सहा) प्राप्त झालेल्या आहवालात ३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. दुसरीकडे नव्याने ३४ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मागील काही दिवसापासून बाधितांची संख्या स्थिर आहे. 

मंगळवारी (ता.पाच) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी बुधवारी एक हजार ७६ अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये एक हजार ३८ निगेटिव्ह, ३४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २१ हजार ६९१ इतकी झाली आहे. उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी बुधवारी दिवसभरात एकाचाही मृत्यू झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या मृत्यूचा आकडा ५७६ वर स्थिर आहे. 

२० हजार ५७२ रुग्ण उपचार घेऊन परतले 

बुधवारी विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील - दोन, जिल्हा शासकीय रुग्णालय - आठ, महापालिकेंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण कक्षातील - १२, मुखेड - सात, देगलूर - एक, भोकर - दोन व खासगी रुग्णालयातील - पाच असे ३७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले. आतापर्यंत २० हजार ५७२ रुग्ण कोरोनाचा उपचार घेऊन घरी परतले आहेत. 

सहा रुग्णांची प्रकृती गंभीर 

नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात - २२, नांदेड ग्रामीण - एक, हदगाव - एक, मुखेड - पाच, कंधार - एक, देगलूर - एक, अर्धापूर - एक, हिंगोली- एक व परभणी येथील एक असे ३४ रुग्ण नव्याने बाधित झाले आहेत. जिल्ह्यातील बाधितांची संख्या २१ हजार ६९१ वर पोहचली असली, तरी यातील २० हजार ५७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ५७६ रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या ३४२ बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी सहा रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत ३९३ स्वॅब अहवालाची तपासणी सुरु होती. 

कोरोना मीटर ः 

बुधवारी पॉझिटिव्ह रुग्ण - ३४ 
बुधवारी कोरोनामुक्त रुग्ण - ३७ 
बुधवारी मृत्यू - शुन्य 
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - २१ हजार ६९१ 
एकूण कोरोनामुक्त रुग्ण - २० हजार ५७२ 
एकूण मृत्यू - ५७६ 
गंभीर रुग्ण - सहा 
स्वॅब तपासणी सुरु - ३९३ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांचे मोठे भाकित, राष्ट्रवादी बद्दल देखील दिले संकेत 

Met Gala 2024 : अरबपती सुधा रेड्डीच्या ड्रेसपेक्षा नेकलेसचीच जास्त हवा, 180 कॅरेटच्या डायमंड नेकलेसने सर्वांचंच वेधलं लक्ष

Renuka Shahane : 'मराठी लोकांना कमी लेखणाऱ्यांना मत देऊ नका'; त्या घटनेनंतर रेणुका यांनी व्यक्त केला संताप

मराठा समाजातील NEET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कुणबी आरक्षण न मिळाल्याने एकाने संपवले जीवन

'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत राहतो'; कराराच्या आधारे कोर्टाने केली आरोपीची सुटका

SCROLL FOR NEXT