File Photo
File Photo 
नांदेड

संकट टळतयं ः जिल्ह्यात केवळ ४४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात रोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहेच. रोज वाढणाऱ्या या रुग्णसंख्येमुळे सामान्य जनतेच्या मनात कोरोनामुळे धडकी भरत आहेच. परंतु दुसरीकडे पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनावर मात करत असल्याने त्यांना घरी सोडण्यात येत आहे. बुधवारी (ता.२७) सात पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोना पाझिटिव्ह रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने प्रशासनास दिलासा मिळत आहे. मंगळवारी पाठविलेल्या एकूण स्वॅब अहवालापैकी बुधवारी (ता.२७) सायंकाळी पाचपर्यंत १४४ अहवाल निगेटिव्ह आले. तर दुसरीकडे एनआरआय यात्रीनिवास येथे उपचार सुरू असलेल्या सात पॉझिटिव्ह रुग्णांचे दुसरे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे १३७ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ८६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आत्तापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन पॉझिटिव्ह रुग्ण फरार असल्याने जिल्ह्यात केवळ ४४ पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. भोसीकर यांनी दिली.  

इतवारा परिसरात दोन दिवसापासून एकही रुग्ण नाही

मागील तीन दिवसापासून इतवारा भागातील करबला व कुंभारटेकडी भागात पॉझिटिव्ह रुग्‍णांची जणू श्रृखलाच सुरू झाली होती. या परिसरात रोज नव्याने पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असल्याने प्रशासनाची चांगलीच चिंता वाढली होती. परंतु दोन दिवसापासून शहरात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. त्यामुळे रुग्णालयातून उपचार घेऊन बरे होणाऱ्या रुग्णसंख्येत भर पडत आहे. 

ग्रामिण भागात खबरदारी घेण्याची गरज 

शहरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असली तरी सर्वात सुरक्षित समजला जाणारा ग्रामिण भागात कोरोना हळुहळु पसरत आहे. त्यामुळे ग्रामिण भागात बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांवर गावकऱ्यांना लक्ष ठेवावे लागणार आहे. लपून गावात येणाऱ्या प्रवाशांची वेळीच प्रशासनाला माहिती कळवावी लागणार आहे. अन्यथा मुंबई, पुणे व इतर शहरातुन येणारे प्रवासी, गावकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण करु शकतील. तेंव्हा गावकऱ्यांना सतर्क राहून गावाची सुरक्षा अबाधित ठेवावी लागणार आहे.    

अशी आहे बुधवारी सायंकाळपर्यंतची स्थिती

- १६८२ जणांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण 
- २२१ जण अजून निरीक्षणाखाली 
- ४५ जण रुग्णालयात क्वारंटाईनमध्ये 
- ४२ नवीन स्वॅब नमुने तपासणीसाठी लॅबकडे पाठविले
- १३७ पॉझिटिव्ह रुग्ण 
- १२२ स्वॅब नमुने तपासणी अहवाल बाकी
- ८६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण घरी परतले
- ४४ रुग्णावर उपचार सुरू
- सात बाधित रुग्णांचा मृत्यू 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

SRH vs RR : आज पडणार धावांचा पाऊस! जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या राजस्थान रॉयल्सशी हैदराबादचा सामना

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT